Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वप्नीलची लहान बहीण पूजाला मदत करू- डॉ नीलम गोऱ्हे

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणानं आत्महत्या केली होती. आज लोणकर कुटुंबाच्या निवासस्थानी जाऊन महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी भेट घेतली.

स्वप्नील च्या कुटुंबाचे पुढे काय? आई वडीलांना पडलेल्या या प्रश्नाचे सांत्वन करतांना डॉ. निलम गोर्हे यांनी स्वप्नीलची लहान बहीण पूजा ला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कशी मदत करता येईल, यासाठी सरकार पातळीवर आम्ही नक्की प्रयत्न करू अशे आश्वासन दिले. प्राथमिक स्वरूपात वयक्तिकरित्या रूपये पन्नास हजाराची मदत कुटुंबीयांना केली. थकीत बँकांचा कर्जाची परतफेड करण्यासाठी सहाय्य जेणेकरून कुटुंबावरचे आर्थिक वोझ कमी होईल यासाठी मा. मुख्यमंत्र्यांचे लक्ष स्वप्नील च्या कुटुंबावर आहे असेही यावेळी त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading