Friday, September 4, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETECHNOLOGY

भाजीविक्रेत्याच्या मुलाने मिळविला अॅमॅझॉनमध्ये ड्रीम जॉब 

जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने ऋषिकेश रासकरची सक्सेस स्टोरी  

पुणे : भाजीविक्रेत्याचा मुलगा ….आयआयटी रुरकीमधील पदवी शिक्षण.. ते अमेरिकन इ-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमॅझॉनमध्ये ड्रीम जॉब. हा उत्तुंग झेप घेणारा प्रवास आहे अवघ्या 25 वर्षीय ऋषिकेश रासकर याचा. परिस्थितीवर मात करीत वेळप्रसंगी शिकवण्या घेवून आणि आपल्या कौशल्यावर मेहनत घेवून ऋषिकेशने हा प्रवास पूर्ण केला आहे. सध्या तो अॅमॅझॉनमध्ये SDE2 अभियंता म्हणून कार्यरत आहे.    

आयआयटी रुरकीचा पदवीधर असणारा ऋषिकेश दुसऱ्याच प्रयत्नांत शिष्यवृत्तीसह आयआयटी ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाला. पदवी शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याला कर्ज काढावे लागले. मग पैसे मिळविण्यासाठी त्याने फ्रीलान्स टेक्नीकल रायटिंग केले, ऑनलाईन शिकवण्या घेतल्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर पसंतीची नोकरी न मिळाल्याने त्याने एक स्टार्टअप सुरु केला. जेव्हा तो  एक अभियंता म्हणून कौशल्य विकसीत करण्यासाठी दिवसातले आणि सुट्टीच्या दिवशीही १२ ते १४ तास कामासाठी खर्च केले. आपली भूमिका अत्यंत चोखपणे निभावत असतानाच तो सतत FAANG (फेसबुकअॅमॅझॉन, अॅपलनेटफ्लिक्स आणि अल्फाबेट म्हणजेच आधीची गुगल या पाच बड्या अमेरिकन कंपन्या) कंपनीत काम करण्याचे स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नांत होता. 

ऋषिकेश म्हणतो, “आज माझे आयुष्यभराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. जागतिक युवा कौशल्य दिनी मला माझी गोष्ट सगळ्यांना सांगताना आनंद होत आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या भारतीय तरुणांनी कौशल्य विकसीत करण्याची गरज खरोखरच गांभीर्याने घेतली पाहिजे. मी लहानपणापासूनच अभ्यासू वृत्तीचा होतो पण कोव्हिड संकटाने आपल्या सगळ्यांना या गोष्टीची प्रखर जाणीव करून दिली की पदवी मिळाली म्हणजे पहिल्या फटक्यात नोकरी मिळणारच असे नाही. मूलभूत गोष्टींचा पाया पक्का करून मी अभियांत्रिकी संकल्पना पुन्हा नव्याने शिकून तयारी केली. तेव्हाच मी स्केलर अकादमीत प्रवेश घेतला.  त्यांनी मला थेअरीचा उपयोग व्यवहारात कसा करायचा हे शिकविले,”

ऋषिकेशच्या यशाबद्दल बोलताना स्केलर आणि इंटरव्ह्यूबीटचे सह-संस्थापक अभिमन्यू सक्सेना म्हणाले, “भारत हा हुशार विद्यार्थ्यांची खाण आहे. ऋषिकेश हा त्यापैकीच एक. गेल्या काही वर्षात शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर नोकरी देण्यापासून कौशल्यावर आधारित नोकरी देण्याकडे वाढता कल आहे. उद्योगक्षेत्राला लागणाऱ्या गोष्टींशी सुसंगत कौशल्य विकास सातत्याने करत राहणे आणि वेगाने बदलणाऱ्या उद्योगजगताशी जुळवून घेणे गरजेचे असल्याचे या महामारीने दाखवून दिले आहे.” 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading