Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

SSC Result: 10 वीचा निकाल उद्या जाहीर होणार

मुंबई : राज्य बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल कधी लागणार याची उत्सुकता होती. अखेर निकालाची तारीख जाहीर झाली आहे. उद्या दुपारी १ वाजता दहावीचा निकाल लागणार आहे. अंतर्गत मूल्मापनाच्या आधारे निकाल दिला जाणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लागेल अशी माहिती दिली होती. राज्य सरकारने निकालासाठी दिलेली डेडलाईन आज संपत आहे. त्यामुळे दहावाचा निकाल लांबणीवर पडणार असल्याची शंका विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली होती. परंतु, दहावीचा निकाल हा दि. 16 जुलै रोजी जाहीर होणार आहे.

१६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी हे दहावीच्या परीक्षेला बसले होते. यामधअये ९ लाख ९ हजार ९३१ मुलं होती तर ७ लाख ४८ हजार ६९३ मुलींनी दहावीची परीक्षा दिली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्याने मूल्यांकन पद्धतीनुसार हा निकाल लागणार आहे.

असा पाहता येईल निकाल

10 वी चे विद्यार्थी mahresult.nic.in वर निकाल पाहू शकतात. निकालासंदर्भात अधिक माहिती महाराष्ट्र शिक्षण बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा mahasscboard.in यावर जाहीर केली जाणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading