PMP ला संचलन तूट देण्याविषयी पीएमआरडीएशी पत्रव्यवहार मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद नाही – लक्ष्मीनारायण मिश्रा
पुणे: पुणे (PMC) व पिंपरी चिंचवड महापालिका (PCMC) ज्याप्रमाणे ‘पीएमपीएमएल’ला संचलन तूट देतात, त्याप्रमाणे पुणे महानगर क्षेत्र विकास विकास महामंडळाने (PMRDA) देखील संचलन तूट द्यावी. पीएमपीच्या बससेवेचा विस्तार पीएमआरडीएच्या हद्दीपर्यंत झाला आहे. त्याला संचालक मंडळाने मान्यताही दिलेली आहे. त्यानूसार महामंडळाने पीएमआरडीएच्या हद्दीत बस मार्ग देखील सुरू केले असून संचलन तूट देण्याविषयी पीएमआरडीएशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, पीएमआरडीएकडून प्रतिसाद मिळालेला नसल्याची माहिती पीएमपी (PMP) चे नवनियुक्त अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
‘पीएमपीएल’च्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.
मिश्रा म्हणाले, प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी अत्याधुनिक प्रणाली आणि डिजिटल माध्यमाद्वारे काम केले जाणार आहे. प्रवाशांना मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे बस प्रवासामध्ये आवश्यक असलेली सर्व माहिती मिळणार आहे. या सुविधेद्वारे प्रवाशांना त्यांच्या मार्गावरील बसचे लाईव्ह लोकेशन समजणार आहे. उत्पन्न वाढीसाठी देखील डिजिटल जाहिरातीवर भर देण्यात येणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.
.मिश्रा यांनी पीएमपीच्या सर्व विभागातील वरिष्ठ अधिकार्यांची आढावा बैठक घेतली. महामंडळाची बससंख्या, कोरोनामुळे बसलेला फटका, सद्यःस्थितीमध्ये सुरू असलेल्या बस याची माहिती घेतली.
बसचे लाईव्ह लोकेशन ते बसमध्ये प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढण्यापर्यंतची ऑनलाईन सुविधा देण्यात येणार आहे, खासगी वाहनांचा वापर कमी करून नागरिकांना सार्वजनिक वाहतूकीकडे वळविण्यासाठी नियोजन.
संचलन तूट येण्याची कारणे आणि त्यावरील उपाययोजना यावर काम करणार. 10 रुपयात बस पुण्यात सुरू केल्या आहेत त्याला भरपूर प्रतिसाद मिळत आहे.
महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर पण बस वाढवणार
त्यामुळे पुण्यातील लोकांना बाहेर पण लवकर जाऊ शकणार आहेत. पुण्यात 17 बस डेपो मधून या नवीन गाड्या प्रवास करणार आहेत. येतून पुढील काळात इलेक्ट्रॉनिक बस पुणे शहरात पुणेकराच्या सेवेत देण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी माहिती लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिली.
