केंद्राच्या ७५% हिश्याच्या ‘मोफत लसी’ पुणे मनपास पुरवण्यात, केंद्राकडूनच् दिरंगाई – गोपाळदादा तिवारी
पुणे : दि १४ जून रोजी पंतप्रधान मोदींनी टीव्ही वरील भाषणातून, देशात (२१ जून पासून) १८ वर्षापुढील सर्वांना ७५% लसीकरण, मोफत करण्याचे धोरण जाहीर केले.. मात्र “सरकारी मोफत लसीकरण केंद्रावर” लसींचा पुरवठा, केंद्र सरकार’ अतिशय तोकडेपणाने करत असल्याचेच निदर्शनास आले असून, केंद्राच्या वाट्याची ७५% मोफत लसीं पुरवण्यात ‘मोदी सरकार’ कमी पडत आहे व एक प्रकारे टाळाटाळ सुरू असल्याचेच दिसत असल्याचा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला..
वास्तविक केंद्राच्या मोफतच्या (७५% ) कोट्याचा पुरवठा ‘सरकारी / मनपा केंद्रांना’ होणे देखील गरजेचे होते व आहे.. मात्र खाजगी “खाजगी हॅाल्पीटल्स / संस्था त्यांच्या २५% कोटा” ऐवजी ५०% हून अधिक प्रमाणात आक्रमकतेने लसी खरेदी करून, त्या नागरीकांना (पैसे घेऊन) देत देखील आहेत…! त्यामुळे ‘विकतचे लसीकरणाचे’ प्रमाण ५०% हून अधिक असल्याचेच निदर्शनास आले आहे.. व त्यामुळे अशा प्रमाणात लसीकरण झाल्यास केंद्र सरकारला ५०% पेक्षाही खूप कमी प्रमाणातच लसी खरेदी कराव्या लागतील..! नागरीक देखील आपोआप कंटाळून व नाईलाजाने पैसे मोजून लसी घेत आहेत हेच सद्या घडत आहे व केंद्र सरकारचे पैसे वाचवण्याचे मनसूबे देखील आता स्पष्ट होऊ लागलेत…असे ही गोपाळ तिवारी यांनी प्रसिध्दीस दीलेल्या निवेदनात सांगितले ..
या विषयी ‘पुणे मनपा’स पुणे शहरातील ‘लसीकरणाची माहीती’ विचारली असता, पुणे मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहीती नुसार सरकारी केंद्रातील पुणे मनपा अखत्यारीतील मोफत लसीकरण केंद्र संख्या१९३असून आजतागायत दिलेल्या लसींची संख्या ३,९५,१५२ एवढी आहे तर दूसरीकडे, खाजगी हॅास्पीटल्स व संस्थांची लसीकरण केंद्र संख्या २२९ असून, विकत करण्यात आलेले लसीकरण (प्रति डोस, कोव्हॅक्सीन १२००₹, कोव्होशिल्ड ७८०₹ तर स्फूटनिक १००₹) संख्या मात्र ६,९३,६४३ एवढी झाली आहे…!
नागरीकांमध्ये कोरोना विषयक घास्ती असून सरकारी / मनपा केंद्रातील ‘मोफत लस’ सहज ऊपलब्ध होत नसल्यानेच् नागरिकांवर विकत लस घेण्याची पाळी येत आहे.. व विकत ची लस सहजपणे ऊपलब्ध होत असल्याचेही निदर्शनास येते आहे..! असेही गोपाळ तिवारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
