Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

23 गावाचा डीपी बाबत शासनाने स्थगिती दिली -विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ


पुणे: स्थायी समितीच्या सदस्यांनी 23 गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी आपली भूमिका जाहीर करणेबाबत उद्या दिनांक 15 /7 /2021 रोजी सकाळी साडेअकरा वाजता मुख्य सभा बोलवण्यात आली आहे.

तसेच ते 23गावांच्या डीपी बाबत मुख्य सभेत मतदान होण्याची शक्यता आहे सदर विषय पुणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.  23गावांच्या डीपी बाबत शासनाने स्थगिती दिली आहे मतदान हे कोणत्या विषयावर असेल तर प्रत्यक्ष सभेत मतदान घ्यावे लागेल व ऑनलाइन मतदान घेता येणार नाही असे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले असून त्याबाबतची माहिती सबंध जोडली आहे सदर प्रकरणी मुख्य सभेत मतदान प्रक्रिया केल्यास ती बेकायदेशीर ठरणार आहे अशी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी आज पत्रकारांना माहिती दिली.

23 गावांच्या डीपी बाबत शासनाने स्थगिती दिली आहे तरी मतदान सत्ताधारी पक्ष घेत आहे याबाबत आम्ही नगर विकास मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, मुख्यमंत्री यांनादेखील आम्ही लेखी स्वरूपात सदर बाब कळविली आहे. तरी उद्या दिनांक 15/7/2021 रोजीची मुख्य सभेत मतदान घेतले तर याबाबत कार्यवाही केल्यास ती बेकायदेशीर ठरणार आहे अशी माहिती विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading