तत्व चिंतन फार्मा केमिकल चा आयपीओ १६ जुलै रोजी येणार
मुंबई : वैशिष्ट्यपूर्ण रसायने उत्पादन कंपनी असणाऱ्या तत्व चिंतन फार्मा केमिकल लिमिटेड कंपनीने त्यांची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) १६ जुलै २०२१ पासून खुली होत असल्याचे जाहीर केले आहे. रचनापूरक एजंट्स, पातळी वाहक उत्प्रेरक, सुपर कपॅसिटर बॅटरीज साठी लागणारे इलेक्ट्रोलाईट सॉल्ट, औषधनिर्माण आणि कृषी रसायने बनविण्यासाठीचे घटक आणि विशिष्ट रसायने उत्पादन असा तत्व चिंतन फार्मा केमिकल लिमिटेड कंपनीचा विविधांगी पोर्टफोलिओ आहे.
या योजनेचा प्रत्येक समभागासाठीचा किंमतपट्टा १,०७३ रुपये ते १,०८३ रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. समभाग खरेदीची बोली लावताना किमान १३ समभागांसाठी आणि त्यानंतर १३ च्या पटीत अर्ज करता येणार आहे.
या आयपीओद्वारे २,२५० दशलक्ष रुपये मूल्याचे नवीन समभाग (“Fresh Issue”) आणि २,७५० दशलक्ष रुपये मूल्यापर्यंतचे समभाग विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. अजयकुमार मनसुखलाल पटेल यांचे २३३ दशलक्ष रुपये मुल्यापर्यंतचे समभाग, चिंतन नितीनकुमार शहा यांचे ८१४ दशलक्ष रुपये मुल्यापर्यंतचे समभाग, शेखर रसिकलाल सोमाणी यांचे ७३० दशलक्ष रुपये मुल्यापर्यंतचे समभाग, दर्शना नितीनकुमार शहा यांचे १०३ दशलक्ष रुपये मुल्यापर्यंतचे समभाग, प्रीती अजयकुमार पटेल यांचे ३४२ दशलक्ष रुपये मुल्यापर्यंतचे समभाग, अजय मनसुखलाल पटेल यांचे ३४२ दशलक्ष रुपये मुल्यापर्यंतचे समभाग, काजल शेखर सोमाणी यांचे ११० दशलक्ष रुपये मुल्यापर्यंतचे समभाग, शीतलकुमार रसिकलाल सोमाणी यांचे ११ दशलक्ष रुपये मुल्यापर्यंतचे समभाग आणि समीरकुमार रसिकलाल सोमाणी यांचे ६५ दशलक्ष रुपये मुल्यापर्यंतचे समभाग यांची विक्री होणार आहे.
सिक्युरिटीज अंड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अंड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१८च्या सुधारित (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 सोबत सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (रेग्युलेशन) रुल्स १९५७च्या १९(२)(ब) सुधारित नियमावलीनुसार (“SCRR”) ही ऑफर खुली करण्यात आली आहे.
