Wednesday, October 21, 2026
Latest NewsPUNE

पुणे स्टेशन परिसरात बस स्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाचा खून

पुणे:पुणे स्टेशन परिसरातील एका बस स्टॉप वर झोपलेल्या प्रवाशाचा चोरीच्या उद्देशाने खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी पहाटे च्या सुमारास हा प्रकार घडला. हा खून कोणी केला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु अशा प्रकारे प्रवाशाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

संजय बाबू कदम (वय 35, रा. घाटकोपर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिरूर तालुक्यातील एक हॉटेलमध्ये ते नोकरी करत होते. मुंबईतील आपल्या घरी जाण्यासाठी ते स्टेशन परिसरात आले होते. परंतु रात्र झाल्यामुळे स्टेशन परिसरातील एका बस स्टॉप वर झोपले होते. बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष कांजळे यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

कधी मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत संजय कदम हे मूळचे घाटकोपर येथील परेरावाडी येथील आहेत. सोमवारी रात्री उशीरा ते घाटकोपर येथे जाण्यासाठी पुणे स्टेशन परिसरात झाले होते. दरम्यान रात्र झाल्यामुळे साधू वासवानी चौकातील असे का बस स्टॉप वर रात्री ते झोपले होते. त्यावेळी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात आरोपीने चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर आणि डोळ्याखाली तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांचा खून केला.

मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासाअंती चोरीच्या उद्देशाने हा खून करण्यात आला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. बंडगार्डन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading