संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि मुंबई विमानतळावर कोव्हिड-१९ तापसणी तंत्रज्ञान सुरु करण्यासाठी व्यावसायिक प्रयोगाची घोषणा

मुंबई : कोव्हिडच्या तिसऱ्या तीव्र आणि अपरिहार्य लाटेविषयी इंडियन मेडिकल असोसिएशनची वाढती चिंता आणि सतर्कता वाढवण्याच्या पार्श्वभूमीवर, भारतातील आघाडीची टेक प्रोटोटायपिंग एजन्सी अॅडव्हान्स सर्व्हिस फॉर सोशल अँड अॅडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स (ASSAR) हिने, ६० सेकंदात विश्वसनीय निकाल देणाऱ्या कोव्हिड-१९ तपासणीकरिता, तंत्रज्ञान, उत्पादने आणि सेवा प्रदान करण्यासाठी, जागतिक तंत्रज्ञान आणि आरोग्यसेवा कंपन्यांकडून अर्ज मागवले आहेत.

दिल्ली आणि मुंबई या महत्त्वाच्या ठिकाणी व्यावसायिक पातळीवर प्रयोग करण्याकरिता हे चाचणी तंत्रज्ञान वापरले जाईल. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे, कोव्हिड विषाणूचे म्युटेशन असलेले विषाणू भारतात येण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या दोन आंतरराष्ट्रीय स्थळांवर लक्ष केंद्रीत करणे होय. तसेच राज्य सरकारांशी समन्वय साधत असे प्रयोग इतर १२ ठिकाणी वापरले जातील. देशांतर्गत आणि आंतर्देशीय हवाई वाहतूक सुरक्षित ठेवण्याकरिता, पुढील लाट आणि लॉकडाऊन होण्यापूर्वी पहिल्या पायलट प्रकल्पाच्या कालावधीत या तपासण्या केल्या जातील.

ASSAR ने आपल्या ‘इझ ऑफ डुइंग बिझनेस’ प्रोग्रामअंतर्गत १० जुलै रोजी या प्रयोगाकरिता अर्ज घेण्यास सुरुवात केली असून सक्षम संस्थांसोबत स्क्रीनिंग प्रक्रियेस २५ जुलैपर्यंत मंजूरी देण्यात आली आहे. तसेच, शॉर्टलिस्ट केलेल्या कंपन्यांचे प्रयोग अंमलबजावणीकरिता ऑगस्ट २०२१ मध्ये लॉजिस्टिकल आणि आर्थिक नियोजनाकरिता एजन्सीकडे जातील.

ASSAR एक्सप्रेसच्या इझ ऑफ डुइंग बिझनेस विभागाचे नॅशनल प्रोग्राम डायरेक्टर, आघाडीचे टेक्नोक्रॅट अभिजीत सिन्हा म्हणाले, “ मागील १६ महिन्यात आपण अपेक्षेपेक्षा खूप काही गमावले आहे. कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेचा आपल्याला जबरदस्त फटका बसला असून आता देशाकडे आणखी सामाजिक-आर्थिक संकट झेलण्याची ताकद नाही. या चाचणी तंत्रज्ञानाद्वारे, काही पूर्व तयारी करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. जेणेकरून संभाव्य लाटेमुळे देशाला आणखी एका लॉकडाऊनला सामोरे जावे लागणार नाही. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील अत्यावश्यक क्षेत्राने आधीच मोठे नुकसान सोसले आहे. ”

या प्रकल्पाच्या प्रारंभीच्या पात्रता निकषांमधील प्रमुख पैलू म्हणजे, ज्यांचे निकाल ६० सेकंदात त्वरित उपलब्ध होतील आणि ज्यात नवे म्युटेशन आणि कोव्हिड-१९ विषाणूचे प्रकार शोधण्याची क्षमता आहे, असेच अर्ज प्रक्रियेत भाग घेऊ शकतात. हे व्यावसायिक पायलट प्रकल्प असून मेडिकल प्रोटोटायपिंग नव्हे; त्यामुळे केवळ सीएमआर / यूएस-एफडीए / सीई-आयव्हीडीयांच्याद्वारे वैद्यकीयदृष्ट्या पूर्व-मंजूर केलेल्या तंत्रज्ञानानालाच पोर्टेबिलिटी, सहजता, किफायतशीरपणा, स्केलेबिलिटी, डेटा फसवणूक प्रतिबंधित करणे, इंटरनेट कनेक्टिव्हिटीसोबत ऑप्टिमायझेशन याबाबत प्रदर्शन करता येईल. 

Leave a Reply

%d bloggers like this: