बाई, आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोड विरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होतीस? तृप्ती देसाईंचा हेमांगीला सवाल

अभिनेता प्रवीण तरडेच्या दुटप्पी वागण्यावरही साधला निशाणा

पुणे : महाराष्ट्रात कालपासून अभिनेत्री हेमांगी कवी हिच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या फेसबुक पोस्टवरुन अनेक चर्चा सुरू आहेत. या पोस्टनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रीय येत आहेत. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही हेमांगीच्या या पोस्टवर भाष्य केले आहे. अभिनेत्री हेमांगी कवी हिची पोस्ट शेअर करत तृप्ती देसाईंनी यांनी म्हटले आहे की, आम्ही शिर्डीच्या ड्रोसकोड विरोधात रान पेटवले होते तेव्हा ही अभिनेत्री कुठे होती, त्याचप्रमाणे इंदुरीकर महाराज आपल्या किर्तनातून महिलांविषयी बदनामीकारक वक्तव्य करत होते तेव्हा तुम्ही कुठे होता, असा सवाल तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=4172255226197701&id=100002397939695

अभिनेत्री हेमांगी कवी हिच्या पोस्टचे कौतुक करत तृप्ती देसाईंनी पुढे म्हटले आहे की, ‘त्यांच्या लेखाचे जाहीर स्वागत आहे. सर्वांनीच आता जाहीरपणे व्यक्त होणे ही काळाची गरज आहे. परंतु मला त्यांना आवर्जून सांगायचे आहे की ज्या महिला या संदर्भात गॉसिप्स करतात किंवा उघडपणे बोलत नाहीत, किंवा विकृत मानसिकतेचे पुरुष असोत त्यांचीच तर मानसिकता बदलण्यासाठी आमचाही प्रयत्न आहे आणि ते करताना ट्रोलिंग, शिवीगाळ, हल्ले याला आम्हालाही सामोरे जावे लागले. मात्र अशावेळी अभिनेत्री हेमांगी कवी किंवा अभिनेते प्रवीण तरडे यांनी देखील आम्हाला पाठिंबा दिला नाही, असे म्हणत तृप्ती देसाईंनी नाराजी व्यक्त केली. पुढे तृप्ती देसाईंनी म्हटले आहे की, जेव्हा महिलांना मासिक पाळी सारख्या विषयावरुन दुजाभाव केला जातो, अनेक ठिकाणी बंदी घातली जाते तेव्हा याविषयी आम्ही कृतीत आंदोलने केली पण अशा वेळी लोक आम्हाला का साथ देत नाहीत हे समजत नाही, असा टोला तृप्ती देसाईंनी लगावला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: