सारस अर्बन को-आॅप क्रेडिट सोसायटी लि. (पतसंस्था) मोठया आर्थिक घोटाळ्याच्या गर्तेत

पुणे : सारस अर्बन को-आॅप क्रेडिट सोसायटी (लि.) पतसंस्थेचे संचालक व अध्यक्ष गणेश धारप (माजी सदस्य, लघु उद्योग भारती) यांच्या व्यवस्थापनाखाली सोसायटी कोटयवधी रुपयांची कर्ज ही कर्जदाराची योग्य पत चाचणी, मालमत्तेचे मूल्यांकन वा व्यक्तीचे सीबील रेकॉर्ड याबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवून दिली गेली असल्याचा आरोप कोथरुडमधील सचिन फोलाने यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीची दखल घेत प्रथम सत्र न्यायदंडाधिकारी डी. ए. अरगडे यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्याला सारस अर्बन को-आॅप क्रेडिट सोसायटी लि. कार्यकारणी विरुद्ध सचिन फोलाने यांनी दिलेल्या तक्रारीचा तपास सुरू करायचे निर्देश दिले आहेत.

सचिन फोलाने यांच्या तक्रारीनुसार  तसेच कर्ज असणा-या मालमत्तांच्या सात बाराच्या उता-यांवर कर्जाच्या नोंदी होऊ दिल्या नाहीत, ज्यामुळे या जमिनी परस्पर विकता येत असत. असे सर्व गैरप्रकार हाताळण्यासाठी गणेश धारप यांनी वैकुंठ कुंभार नावच्या कर्जदाराकडून २ कोटी रुपयांची लाच घेतल्याचेही तक्रारीमद्धे म्हटले आहे.
तसेच माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकार परिषद (राज्यमंत्री) व चेअरमन यशवंत बँक शेखर चरेगावकर नावाच्या खातेदारालाही धारप यांनी संचालक मंडळाच्या कोणत्याही पूर्व मान्यतेशिवाय वा कोणत्याही तारणाशिवाय मुदत ठेवीवर कर्ज व ओवरड्राफ्टची देखील सुविधा अशाच पद्धतीने उपलब्ध करून दिल्याचे समजते. शेखर चरेगावकर यांचे नाव पुढे थकबाकीदारांच्या यादीत येऊन देखील चरेगावकर यांच्या राजकीय वर्तुळातील ओळखी लक्षात घेऊन त्यांच्यावर कोणतीही कारवाई सोसायटीनी केली नसल्याचेही समजते.
सारस पतसंस्थेतील हा घोटाळा सचिन फोलाणे यांच्या वतीने त्यांची बाजू मांडणारे अ‍ॅड. ऋषीकेश चव्हाण यांच्या प्राथमिक अंदाजानुसार ११ कोटी रुपया एवढा मोठा असेल असे समजते. भाजपा युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष सचिन फोलाने म्हणाले, सहकारी पतसंस्था तसेच सहकारी बँका मध्ये अशा स्वरूपाचे घोटाळे नित्याचे होत चालले असून या सहकारी संस्थांच्या मूळ संकल्पनेलाच धोका निर्माण झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. महाराष्ट्रात या पूर्वी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक व त्या पाठोपाठ शिवाजीराव भोसले सहकारी बँक अनेक बँक पतसंस्था मधील अशाच पद्धतीचे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे समोर आले आहेत. सारस को-आॅप क्रेडीट सोसायटीचा घोटाळा हा याच प्रकारचा अजून एक मोठा दखलपात्र गुन्हा संभवतो आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: