‘विद्यार्थी – भारतीय घटनेचे बिनीचे शिलेदार’ चर्चासत्र शनिवारी

पुणे – शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे भारताचे भूतपूर्व सरन्यायाधीश य.वि. चंद्रचूड यांच्या स्मरणार्थ आॅनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.  शनिवार, दिनांक १७ जुलै रोजी दुपारी ४ वाजता आॅनलाईन पद्धतीने हे चर्चासत्र होणार आहे. यू टयूब आणि फेसबुकच्या माध्यमातून यामध्ये सहभागी होता येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड हे ‘विद्यार्थी – भारतीय घटनेचे बिनीचे शिलेदार’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय ललित यांचेही मार्गदर्शन चर्चासत्रात  मिळणार आहे. शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड. सदानंद फडके, नियामक मंडळ अध्यक्ष अ‍ॅड. सोहनलाल जैन, नियामक मंडळ उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे तसेच अन्य पदाधिकारी, कर्मचारी यामध्ये सहभागी होणार आहेत.

भारताचे भूतपूर्व सरन्यायाधीश कै. य.वि. चंद्रचूड हे सन १९८० ते २००८ अशी २८ वर्षे शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष होते. तसेच नू.म.वि. प्रशालेचे ते विद्यार्थी होते.  कै. यशवंतराव तथा  य.वि. चंद्रचूड यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी या आॅनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा लाईव्ह कार्यक्रम – Facebook live link – (https://www.facebook.com/Welingkar/live_videos/) Youtube link – (https://youtu.be/_EG0N2Z5dJQ) या लिंकवरुन पाहता येईल. तरी संस्थेचे माजी विद्यार्थी, हितचिंतक व नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: