Pune – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही महापालिकेला तब्बल १७५५ कोटीचे उत्पन्न

पुणे: कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन  लावलेला असल्याने उत्पन्न  घटेल असा अंदाज लावला जातो होता. मात्र, महापालिकेला या तीन महिन्याच्या काळात तब्बल १७५५ कोटीचे उत्पन्न मिळाले असल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. पुढील काळातही उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करून यावर्षात ६ हजार १०० कोटी रुपयांचे लक्ष निश्‍चीत केले आहे.

पुणे महापालिकेच्या महसुल समितीची बैठक आज झाली, त्यामध्ये हा आढावा घेण्यात आला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिकेला यंदा ५ हजार ६०० कोटींचे उत्पन्न मिळेल, त्यातील ४ हजार ३०० कोटी हे पगार व देखभाल दुरुस्तीच्या कामांवर खर्च होतील. विकास कामांसाठी केवळ १हजार ३०० कोटी रुपये मिळतील, त्यासाठी महत्त्वाच्या कामासाठी प्राधान्य दिले पाहिजे अशी भूमिका काही दिवसांपूर्वी आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतली होती. या भूमिकेवर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती.

महापालिकेच्या उत्पन्नाचा आढावा घेतला असता त्यामध्ये एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात १ हजार ७५५ कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाल्याचे समोर आले. त्यामध्ये मिळकतकर विभागाचा मोठा हातभार लागला असून, ८४६ कोटी रुपये मिळाले आहेत. तर स्थानिक संस्था करातून ५७३ कोटी रुपये मिळाले आहेत. दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बांधकामे सुरू ठेवण्यात आली होती, त्याचा फायदाही महापालिकेला झाला असून, बांधकाम शुल्कातून २७८ कोटी रुपये मिळाले आहेत.तसेच पाणी पुरवठा, पथ, आकाशचिन्ह, अग्निशामक, मालमत्ता व्यवस्थापन या विभागाकडूनही महापालिकेला हातभार लागला आहे.असे मिळाले उत्पन्नविभाग रक्कम (कोटीत)स्थानिक स्वराज्य संस्था कर – ५७४मिळकतकर – ८४६बांधकाम शुल्क – २७८पाणी पुरवठा विभाग – १९मालमत्ता व्यवस्थापन – १७परवाना व आकाशचिन्ह – १पथ विभाग – ४अग्निशामक विभाग – १४

‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट असतानाही महापालिकेने एप्रिल, मे व जून महिन्यात १७५५ कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. हे खूप चांगले संकेत आहेत. विकास कामांसाठी अतिरिक्त निधी देखील यातून उपलब्ध होणार आहे.’- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती‘कोरोनाच्या काळात महापालिका प्रशासनाने केलेल्या प्रयत्नामुळे चांगले उत्पन्न मिळाले आहे. पहिल्या तीन महिन्यात १७५५ कोटी रुपये मिळाले असले तरी या वर्षभरात ६१०० कोटी रुपये मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.’- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Leave a Reply

%d bloggers like this: