Pune – बहुजन समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन
पुणे : बहुजन समाज पक्षाचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे एकदिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले .यानंतर जिल्हाधिकारी यांना जिल्हाध्यक्ष हुलगेश चलवादी ,महाराष्ट्र सचिव सुदीप गायकवाड यांनी मागण्यांचे निवेदन दिले व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्यामार्फत हे निवेदन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात येणार आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य सचिव भाऊसाहेब शिंदे ,राहुल ओव्हाळ ,बापू कुदळे ,काळूराम चौधरी ,तसेच जिल्हा व विधानसभा मतदारसंघा मधील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात अनुसूचित जाती जमातीच्या कर्मचारी यांच्या पदोन्नती मधील आरक्षण कायम ठेवण्यात यावे ,ओ बी सी च्या आरक्षनाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे व त्यांचे राजकिय आरक्षण पूर्वरत करावे , शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात यावा,पेट्रोल डिझेल बरोबर घरगुती गॅस व खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यात याव्या ,तसेच वाढत्या महागाईला आळा घालण्यात यावा,कोरोनामुळे सर्वच आर्थिक परिस्थितीत सापडले असून त्यांचे वीज बिल माफ करावे , कोविड मुळे मृत्यू पावलेल्या मृतकाच्या परिवारास आर्थिक मदत देण्यात यावी , 1 ते 10 गुंठ्याच्या प्लॉटची खरेदी विक्री सुरू करावी , राज्यातील100/ प्राध्यापक भरती प्रचलित 100 बिंदू नामावली विषय /विभाग निहाय व्हावी असे म्हटले आहे .
