मोदी सरकारने जर देशच उध्वस्त करायचा ठरवलं असेल तर काय करणार? -नाना पटोले

पुणे: केंद्रातील मोदी सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार सोहळा नुकताच झाला आहे. त्यामध्ये ४३ जणांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचसोबत केंद्र सरकारने नवीन सहकार मंत्रालयाची निर्मिती केली असून त्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  नाना पटोले यांनी विविध घडामोडींवर चालू भाष्य केले.

केंद्र सरकारने मंत्री बदलले,पण डबे बदलून उपयोग नाही इंजिनच खराब झाले आहे अशी बोचरी टीका केंद्रातील मंत्रिमंडळ बदलावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मात्र आमच्या महाविकास आघाडी सरकारची गाडी पण चांगली आणि ड्रायव्हरपण चांगला आहे असेही ते म्हणाले.

काँग्रेस पक्ष हा गोरगरिबांच्या बाजूने आहे स्वातंत्र्य काळ च्या आधी पण कॉंग्रेस पक्षाने गोरगरिबांना व शेतकऱ्यांना मदत केली भाजप सरकार 2014 साली सत्तेत आले राहुल गांधी हे सत्तेवर नसतानाही
त्यांनी तळागाळात जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस व मदत केली स्वातंत्र्यपूर्व काळापासून शेतकऱ्यांना काँग्रेसने भरपूर मदत केली इंधन ,डिझेल, गॅस चे दर मोदी सरकारने भरपूर वाढवले आम्ही त्या विरोधात अख्या महाराष्ट्र भर आंदोलन करत आहोत सध्या देशातील नागरिकांना कोरोना मुळे भरपूर आर्थिक समस्या येत आहे   भाजप सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केलय. चंद्रकांत पाटील यांनी नितीन गडकरींनी विकत घेतलेल्या साखर कारखान्यांच्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केलीय. नितीन गडकरींना अडचणीत आणण्यासाठी सहकार मंत्रालय स्थापन केलय का  ? अशी टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली
ज्यांना सहकारातील ए बी सी डी माहित नाही त्यांनी सहकारात लक्ष घातलय.  त्यांना सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून सगळे विकून टाकायचय का ? सहकार उद्ध्वस्त करायचाय का  ? अशी टीका नाना पटोले यांनी सहकार मंत्री अमित शहा वर केली
तसेच मुख्यमंत्री उद्गाराव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी व कार्यकर्त्यांना शिवसेना बळकट करत स्थानिक स्वराज्य संस्थांसह महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा या सूचनेवर पटोले यांनी प्रतिकिया देताना म्हणाले, शिवसेना प्रमुखांनी तयारी कराअसे जर सांगितले असेल तर त्यात वाईट काय? मात्र, याचा अर्थ मध्यावधी निवडणुका होतील असा नाही. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.
मोदी सरकारने जर देशच उध्वस्त करायचा ठरवलं असेल तर काय करणार? असेही ते म्हणाले.  ते आज पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला या पत्रकार परिषदेला रमेश बागवे अध्यक्ष पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटी ,अभय छाजेड, नगरसेवक अविनाश बागवे,   काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार,माझी महापौर कलम    व्यवहारे , माझी आमदार मोहन जोशी आमदार विश्वजित कदम,आजी माजी नगरसेवक ,शहर पदाधिकारी, ब्लॉकअधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.

ओ बी सी चा राजकीय घात भाजपने केला.
विधिमंडळाच्या बाहेर अभीरुप विधानसभा भरवली.  मी अध्यक्ष असतो तर कारवाई केली असती.  ठरवून निर्णय घेतला असता . विधानसभा अध्यक्षांना शिवीगाळ केली सगळे प्रश्न सोडवता पण आले असते विरोधी पक्षनेते ही मागणी पूर्ण करा अशी आक्रमक भूमिका घेतात त्यांनी त्यांच्या सरकारच्या काळात ओबीसी व मराठा आरक्षणाचे चे प्रश्न काय सोडवले त्यांनी देवेंद्र फडणविस यांचा पण समाचार घेतला
आमच्या पक्षाच्या नेत्यांना मिटिंग असतात याचा अर्थ नेत्यांमध्ये वाद आहे असं नाही नितीन राऊत, बाळासाहेब थोरात दिल्ली बैठकीला जातात विरोधी पक्ष आमच्या नेत्यात वाद सुरू आहे असे म्हणतात माझे पण भाजपला महाराष्ट्रात आता काही काम राहिले नाही अध्यक्ष बदल्यात वाढीव मंत्रिपद अस काही सुरू आहे याबद्दल मला नाही माहिती.
केंद्राच्या शेतकरी विरोधी तिनी कायद्यांना काँग्रेसचा विरोध आहे आम्ही शेतकरी हिताचा कायदा राज्यात करू आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत
जेजे भाजप मध्ये गेले ते शुद्ध आणि नाही गेले तर ईडी सी बी आय ची कारवाई त्यामुळे त्यांनी भाजपची वाट धरली आहे असा टोला पण त्यांनी नारायण राणेंना  लगावला.

Leave a Reply

%d bloggers like this: