Wednesday, June 17, 2026
BusinessLatest NewsNATIONAL

झोमॅटो लिमिटेडचा आयपीओ १४ जुलै पासून

नवी दिल्ली०८ जुलै २०२१: झोमॅटो लिमिटेड (पूर्वीची झोमॅटो प्रायव्हेट लिमिटेड आणि झोमॅटो मिडिया प्रायव्हेट लिमिटेड) (झोमॅटो किंवा कंपनी) आपल्या प्राथमिक समभाग विक्रीला (आयपीओ) येत्या १४ जुलै २०२१ पासून सुरवात करत आहे.

या योजनेसाठी प्रती समभाग रु. ७२ ते रु. ७६ किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. समभाग खरेदीची बोली लावताना किमान १९५ समभागांसाठी आणि त्यानंतर १९५ च्या पटीत अर्ज करता येणार आहे.

या आयपीओद्वारे ९०,००० दशलक्ष मूल्याचे नवीन समभाग (“Fresh Issue”) आणि इन्फो एज (इंडिया) लिमिटेडचे – विक्रेता समभागधारक (“Selling Shareholder”) ३७५० दशलक्ष मूल्यापर्यंतचे समभाग विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

या आयपीओ योजनेत ६५ लाख समभाग पत्र कर्मचाऱ्यांकरिता विहित प्रमाणात खरेदीसाठी राखीव ठेवण्यात येणार असून हे प्रमाण कंपनीच्या आयपीओ पश्चात एकूण समभाग भांडवलाच्या ५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.

सिक्युरिटीज अंड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अंड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१८च्या सुधारित (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 सोबत सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (रेग्युलेशन) रुल्स १९५७च्या १९(२)(ब) सुधारित नियमावलीनुसार (“SCRR”) ही ऑफर खुली करण्यात आली आहे.

सेबी आयसीडीआर नियामकांच्या ६(२) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना  वाटपासाठी ७५ टक्क्यांपेक्षा कमी समभाग उपलब्ध करून देता येणार नाहीत. विक्रेता समभागधारकांशी आणि व्यवस्थापकांशी सल्लामसलत करून सेबी कंपनी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील ६० टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading