Wednesday, October 21, 2026
Latest NewsPUNE

‘गेट रायटिंग’ कार्यशाळेचे आयोजन

पुणे  : आपले विचार, मते, कल्पना व्यक्त करायच्या असतील तर लेखन कौशल्य हे महत्त्वाचे मानले जाते. मात्र नवोदित लेखकांना लेखन कोठून सुरू करावे, कशा पद्धतीने करावे, शैली व भाषा कशी असावी या संदर्भात अनेक प्रश्न पडत असतात. हेच लक्षात घेत सुप्रसिद्ध लेखिका सुधा मेनन यांच्या वतीने शनिवार दि. १७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता ‘गेट रायटिंग’ या लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यशाळा झूम व्यासपीठावर ऑनलाईन स्वरूपात पार पडेल. यामध्ये लेखनाला सुरुवात करतानाच्या महत्त्वाच्या गोष्टींबरोबरच काही कल्पना, लेखन शैली आदी बाबी इच्छुकांना समजून घेता येणार आहेत. ‘गेट रायटिंग’ या उपक्रमाची संकल्पना ही स्वत: सुधा मेनन यांची असून त्या ‘रायटिंग विथ वूमेन वर्कशॉप’च्या प्रणेत्या आहेत. एक अनुभवी पत्रकार, प्रेरक वक्त्या यांबरोबरच पाच पुस्तकांच्या लेखिका म्हणून देखील सुधा मेनन यांची ओळख आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading