Wednesday, October 21, 2026
ENTERTAINMENTLatest NewsNATIONALTOP NEWS

Sad News – दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

मुंबई – बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले, ते 98 वर्षांचे होते.

दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. अखेर उपचारादरम्यान, त्यांनी आज पहाटे 7 वाजून 30 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.

काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना रुग्नायालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यापासूनचं त्यांचे चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते.

पण, आज पहाटे उपचार सुरू असताना दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading