भास्कर जाधव यांनी आईवरुन शिवी दिली, चंद्रकांत पाटील यांचा आरोप

मुंबई :  विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन काल संपन्न झालं. हे अधिवेशन महाविकास आघाडी सरकारने गाजवलं. विरोधक असलेल्या भाजपला ठाकरे सरकारने बॅकफूटवर ढकललं. यात मॅन ऑफ द मॅच ठरले ते कोकणातले भास्कर जाधव. ते भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करून पहिल्या दिवशीच सत्ताधारी विरोधकांवर हावी झाले. दुसऱ्या दिवशीही 12 आमदारांच्या निलंबनाचा निषेध करण्यासाठी विधिमंडळ कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय भाजपने घेतला. यावेळी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून भाजपने प्रति विधानसभा भरवली. या प्रती विधानसभेतही मोठा गोंधळ आणि राडा झाल्याचं पाहायला मिळालं. आता याच गदारोळावरून आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. तालिका सदस्य भास्कर जाधव यांनी ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना काही सदस्यांनी सभागृहात गदारोळ केला. विरोधी सदस्य आत घुसले त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या असं म्हणत विरोधकांना सुनावलं होतं. त्यातच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भास्कर जाधव यांनी आईवरुन शिवी दिली असल्याचा आरोप केला आहे.

“भास्कर जाधव यांनी आईवरुन शिवी दिली. आमच्या कार्यकर्त्याने काही म्हटलं असेल तर ते सरकारला म्हटलं असेल. सरकार हरामखोर वैगेरे…पण भास्कर जाधव यांना तुम्ही असं कोणी म्हटलं नाही. पण भास्कर जाधव यांनी आईवरुन शिवी दिली,” असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: