Pune -शिक्षण संस्थांनी फी कमी करण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांचे आंदोलन
पुणे:पुण्यातील सुमारे पाच पाच लाख विद्यार्थ्यांच्या फीमध्ये 50/कपात झाली पाहिजे यासाठी पुण्यातील विविध संघटना व पालकांनि शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आज आंदोलन केले या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ने पण या आंदोलनात सहभाग घेतला महात्मा फुले मंडई ते शिक्षण आयुक्त कार्यालय मोर्चा काढण्यात आला.
मला पूर्ण शिक्षण मिळाले नाही मी पूर्ण फी का भरायची? विद्यार्थी पालकांची कोरोना काळात झाली पैशाची हानी नाही सहन करणार शाळांची मनमानी आशा घोषणा विविध संघटना व पालकांकडून आंदोलनाच्या वेळी करण्यात आला.
आंदोलनाला विविध संघटना , पालक, राष्ट्रीय निमंत्रक आरपीआय मंदार जोशी ,रिपब्लिकन पार्टी चे डॉ. सिद्धार्थ धेंडे, व रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, गेल्या मार्चपासून कोरोना चालू झाल्यापासून विद्यार्थी शाळेत व कॉल कॉलेज मध्ये न जाता घरीच आहेत त्यांना खेळ गॅदरिंग या ऍक्टिव्हिटी त्यांच्या बंद आहेत तरी शाळा विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी आकारत आहे कोरोना व टाळेबंदी मुळे खूप पालकांचे रोजगार गेले आहेत तरी काही शाळा गुंडगिरी करून पालकांकडून भरपूर फ्री वसूल करत आहेत विद्यार्थी है टॅब वर ऑनलाइन शिक्षण शिकत आहेत शाळांची गुंडगिरी हे पालक विविध संघटना
व रिपब्लिकन पार्टी हे सहन करणार नाही विविध शाळा कडून 30 ते 40 टक्के फ्री कपात केली पाहिजे यासाठी आम्ही आज शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करत आहोत आंदोलन झाल्यावर आम्ही शिक्षण आयुक्तांना निवेदन देणार आहोत.
