Saturday, June 13, 2026
ENTERTAINMENTLatest NewsTECHNOLOGY

जेएल स्ट्रीमने ‘व्हीआयपी फॅन फीड’ फीचर सुरु केले

मुंबई : जेएल स्ट्रीम या सोशल लाइव्ह स्ट्रीमिंग अॅपने त्यांच्या इन्फ्लूएंसर्ससाठी नुकतेच ‘व्हीआयपी फॅन फीड हे नवे फीचर सुरु केले आहे. याद्वारे इन्फ्लूएंसर्सना त्यांचा एक्सक्लूझिव्ह कंटेंट अपलोड करता येईल तसेच त्यावर कमाई करता येईल. यासोबतच चाहत्यांशी चॅट करता येईल आणि जेएल स्ट्रीम अॅपद्वारे सर्व काही लाइव्ह ब्रॉडकास्ट करता येईल.

‘व्हीआयपी फॅन फीड’ फीचरद्वारे, जेएल स्ट्रीम अमर्याद मनोरंजनाचे दरवाजे, विविध लाभ आणि संपूर्ण नवा जागतिक चाहता वर्ग खुला करत आहे. चाहत्यांना तुमच्या स्वत:च्या प्रमाणित व्हीआयपी प्रोफाइलद्वारे एक्सक्लूझिव्ह कंटेंटची सुविधा देत तुम्ही स्वत:चे कंटेंट चॅनलही सुरु करू शकता. याद्वारे चाहत्यांशी चॅट करू शकता, लाइव्ह जाऊ शकता, संवाद साधू शकता आणि तत्काळ कॅश केले जातील असे व्हर्चुअल गिफ्टही मिळवू शकता. जेएलस्ट्रीम अॅपवर आता तुम्ही तत्काळ नियंत्रण मिळवू शकता आणि पैसेही कमावू शकता.

जेएल स्ट्रीम इंडियाचे संस्थापक आणि सीईओ राज कुंद्रा म्हणाले, “ सर्व इन्फ्लूएंसर्सचा चाहता वर्ग वाढवण्यासाठी आमचे एक अॅप वन स्टॉप प्लॅटफॉर्म बनावे, असा आमचा उद्देश आहे. स्ट्रीमर्सना जगातील यूझर्सपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणारे आणखी एक फीचर म्हणजे ‘व्हीआयपी फॅन फीड’. याद्वारे एक्सक्लूझिव्ह कंटेंट शेअर करता येतोच, तसेच व्हर्चुअल गिफ्टचा पर्यायही यात आहे. त्यामुळे क्रिएटर्सना त्यांच्या निष्ठावंत चाहत्यांद्वारे कमाई करता येईल आणि त्याचे तत्काळ पैसेही मिळतील.”

एक एक्सक्लुझिव्ह शॉर्ट व्हर्टिकल व्हिडिओ आणि लाइव्ह स्ट्रीमिंग अॅप असलेले जेएल स्ट्रीम जगभरातील लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. क्रिएटर्सना त्यांचा चाहतावर्ग वाढवण्यास मदत करते आणि त्याच वेळी त्यांना पैसे कमावण्याची संधीही प्रदान करते. व्हीआयपी फॅन फीड हे व्हिडिओ आणि पिक्चर्स या दोघांसाठी व्हर्टिकल ओन्ली फीचर आहे. जेएल स्ट्रीम हे जगात एकमेव असे अॅप आहे, जे तुमच्या विक्रीवर तत्काळ पेमेंट देते. लाँचिंगनंतर फक्त ६ महिन्यातच जेएल स्ट्रीमने कंटेंट क्रिएटर्सना ५००,००० डॉलर्स पेक्षा जास्त पैसे दिले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading