Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर

पुणे: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) काशेवाडी शाखेच्या वतीने माजी शहराध्यक्ष अशोक शिरोळे यांच्या नैतृत्वाखाली काशेवाडी येथे तपासणी शिबीर आरोग्य शिबीर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
‘कोरोना महामारी मध्ये काशेवाडी भवानी पेठ येथे सर्वाधिक रुग्ण आढळून आले सदर भागांमध्ये सातत्याने आरोग्य शिबिर व जनजागृतीच्या माध्यमातून पण नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे काशेवाडी भागातून कोरोना हद्दपार करण्यात आला यापुढेही अशाच पद्धतीने आरोग्य शिबीर भरवण्यात येणार आहे’ असे आपल्या भाषणात शिरोळे यांनी सांगितले.

शिबिरामध्ये दिव्यांगांना सायकलचे वाटप देखील करण्यात आले तज्ञ डॉक्टरांची मोठी टीम या ठिकाणी उपस्थित होती विविध व्याधी वरती देखील त्यांनी मार्गदर्शन केले तसेच मोफत औषधे देखील देण्यात आली.
याप्रसंगी पुण्यनगरी चे उपमहापौर सुनिता वाडेकर, शहराध्यक्ष संजय सोनवणे, अशोक कांबळे, शैलेंद्र चव्हाण, मोहन जगताप, नगरसेवक रशीद शेख, ॲड. मंदार जोशी, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे, मायकल वाघमारे, शाम सदाफुले, मुकेश काळे, राजेश गाडे, संदीप धांडोरे, शौकत बागवान, नवेद अन्सारी, खैरूनबी शेख, मोमिना शेख, रुपाली गायकवाड पदाधिकारी व स्थानिक नागरिक सोशल मीडिया चे पालन करून उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading