Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

लसीकरण हे राष्ट्रीय कर्तव्य- आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे

पुणे : आपल्याकडे लसीकरण हे एकच हत्यार आहे, ज्या द्वारे आपण कोरोनाला नियंत्रणात आणू शकतो. आज देशामध्ये कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. पण तिसऱ्या लाटेचा धोका संभवतो आहे. त्यामुळे प्रत्येकाचे लसीकरण व्हायला हवे. लसीकरण हे मानवतेच्याच दृष्टीने नाही तर राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे प्रतिपादन इंडियन मेडीकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले.

आनंदवन बहुउद्देशीय संस्था, भाजप एनजीओ आघाडी, पुणे शहर आणि द कॉन्सप्शन ग्रुप यांच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे आयोजन शिवाजीनगर मधील शिरोळे रस्ता येथे करण्यात आले आहे. या लसीकरण शिबिराचे उद्घाटन डॉ. अविनाश भोंडवे यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक सुशील मेंगडे, गणेश कळमकर, दत्ता खाडे, आनंदवन बहुउद्देशीय संस्थचे डॉ. अजय दुधाणे ,दत्तात्रय सोनार, गणेश भोसले, प्रकाश पवार, विवेक राजगुरू, विनोद चव्हाण, धनंजय मराठे ,गणेश इरला, अविनाश पवार, निखिल कदम,सागर पांचाळ,योगेश मोरे,संदीप चव्हाण, अनिल ववले,संदीप सांवत ,ऋतिक पवार,शाम खेंगरे ,रुपेश पवार उपस्थित होते.

डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, भारतातील सर्व लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर ठेऊन नागरिकांनी लसीकरण करुण घ्यायला हवे. गरोदर आणि स्तनदा मातांनी देखील लसीकरण करुन घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ.अजय दुधाणे म्हणाले, आनंदवन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जास्तीत जास्त पुणेकरांचे लसीकरण होईल या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. संस्थेच्या वतीने एमएमसीसी महाविद्यालयात देखील लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. लसीकरण मोहीमेसाठी काम करणाऱ्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे देखील त्यांनी यावेळी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading