Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNE

Pune – गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 268 नवीन रुग्ण 226 जणांना डिस्चार्ज

पुणे – शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे मागील काही दिवसापासून शहरात नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत आहे पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 268 नवीन रुग्णांची नोंद झाले आहे तर 226 रुग्णांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4  लाख 80 हजार 150 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी 4लाख 68 हजार 872 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या चोवीस तासात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे यामध्ये शहरातील
5 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 6 रुग्णांचा समावेश आहे आतापर्यंत पुणे शहरात 8622 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर   5228     स्वॅब   तपासण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत पुण्यामध्ये 27 लाख 2 हजार 920 प्रयोगशाळा मध्ये चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरांमध्ये सध्या 2716 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत त्यापैकी 284 रुग्ण गंभीर आहेत तर 450 रुग्ण ऑक्सिजन वर उपचार घेत आहे अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading