शरीर, मन , भावनांची व्यापक चिकित्सा देणारे “स्वकाया” – होलिस्टिक हीलिंग सेंटर पुण्यात सुरू

आनंद म्हणजे वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळी गोष्ट असते. तरीसुद्धा, त्याची मुळे नेहमीच मन, शरीर व भावनांने एकत्र येणार्‍या आनंदीशी खोलवर जोडलेली असतात.
आज समाजास शरीराच्या ,मनाच्या आणि भावनांच्या व्यापक चिकित्सेची गरज आहे, आणि अणेकदा ही चिकित्सा पद्धत्ती लक्झरी व प्रत्येकास न परवडणारी असते, म्हणुनच आजची गरज ओळखणार्या महिला लिपी खेमका यांनी स्वकाया नामक होलिस्टिक हीलिंग सेंटर सुरू करण्याचा निश्चय केला होता. येथे त्या अत्यंत वाजवी दरात ही चिकित्सापद्धत्ती सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहेत.
बोट क्लब येथे शहराच्या मध्यभागी नव्याने सुरू झालेल्या स्वकया या वेलनेस सेंटर मध्ये पाळीव प्राण्यांद्वारे थेरपी आणि सर्वांगीण , मानसीक भावनिक उपचार दिले जातात. पाळीव प्राण्यांच्या मदतीने रूग्णांवर उपचार आणि समस्यांचे निराकरण करणारे हे अद्वितीय केंद्र म्हणजे स्वकाया.
 
अ‍ॅनिमल असिस्ट थेरपी आज देश- विदेशात झपाट्याने वाढत चालली आहे. यामध्ये पाळीव कुत्री- मांजरे किंवा इतर प्राण्यांना ट्रेन केले जाते. आणि त्यांच्या मदतीने हृदयरोग, औदासिन्य, कर्करोग आणि मानसिक आरोग्याच्या विकारांसारख्या आरोग्यविषयक समस्यांपासून बरे होण्यासाठी मदत होते. या थेरेपीनुसार पाळीव प्राण्याशी संवाद साधल्यास बर्‍याच शारीरिक आणि मानसिक समस्यांचे निराकरण होण्यास मदत होते. याचसोबत रक्तदाब कमी करण्यात आणि एकूणच हृदय व रक्तवाहिन्या संबंधीच्या समस्या कमी करून आरोग्य सुधारण्यास मदत होते. या उपचार पद्धत्तीच्या मदतीने शांत प्रभाव देणारे एंडोर्फिन रिलीज होते ज्यामुळे वेदना , तणाव कमी करण्यास आणि आपली संपूर्ण मानसिक स्थिती सुधारण्यास ही थेरेपी मदत करू शकते.
या केंद्रात रूग्णांना मदत करण्यासाठी ७ कुत्री, ८-१० मांजरी आणि ७ ससे आहेत आणि केंद्राने यासाठी अ‍ॅनिमल एंजल्सशी करार केला आहे. यात सर्व प्राण्यांना माणसांना मदत करण्याचे प्रशिक्षण दिले जाते आणि रुग्णांच्या मदतीसाठी त्यांना अगोदर एका वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. या थेरेपी मध्ये लहान मुले, किशोरवयीन आणि ज्येष्ठ नागरिकांना उपचार देता येतात. आणि ही थेरेपी अत्यंत वाजवी दरात तासाला ४०० रूपयांपासून सुरू होते. हे केंद्र सर्व पुणेकरांसाठी खुले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: