Sunday, September 6, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

ग्रेज इन कोर्टात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र !

लंडन : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण देशातील अनुयायांसाठी एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमधील ज्या ‘ग्रेज इन’ कोर्टातून बॅरिस्टर पदवी मिळवली तिथेच आता डॉ. आंबेडकर यांचे तैलचित्र लावून सन्मान करण्यात आला आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेले बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय खडतर परिस्थितीतून मार्ग काढत बॅरिस्टर होण्यापर्यंतची मजल मारली होती. जिथून त्यांनी बॅरिस्टर पदवी मिळवली तिथेच त्यांचं तैलचित्र लावणं जाणं हा अवघ्या भारताचाच बहुमान आहे.

लॉर्ड डेव्हिड अल्टन यांनी शेअर केला फोटो –

ब्रिटिश राजकीय तज्ज्ञ, मानवाधिकार कार्यकर्ते आणि हाऊस ऑफ लोर्डचे सदस्य ( राज्यसभा खासदार ) लॉर्ड डेव्हिड अल्टन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून लंडनच्या ‘ग्रेझ इन’ ​​मध्ये डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा जा फोटो लावण्यात आला आहे ते शेअर केलं आहे.

यावेळी लॉर्ड डेव्हिड अल्टन यांच्यासमवेत बाबासाहेबांचे पणतू सुजात आंबेडकर हे देखील उपस्थित होते.

लॉर्ड डेव्हिड अल्टन यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘ग्रेज इन’ मध्ये डॉ. आंबेडकरांच्या चित्राच्या अनावरणप्रसंगी मला खूप आनंद होत आहे. यावेळी लॉर्ड डेव्हिड अल्टन यांनी बाबासाहेबांचे पणतू सुजात आंबेडकर यांना सांगितले की, 21व्या शतकात त्यांनी भारताला जातीपातीच्या विळख्यातून बाहेर काढण्यास प्रयत्न करावेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑक्टोबर 1916 साली लंडनमधील ग्रेज इनमध्ये बॅरिस्टरच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. सोबतच त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये देखील प्रवेश घेतला होता. जिथे त्यांनी अर्थशास्त्राच्या डॉक्टरेट थीसिसवर काम करणं सुरु केलं होतं आणि जो त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण देखील केला होता. त्यामुळेच त्यांना डॉक्टरेट ही पदवी देखील बहाल करण्यात आली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading