Pune – गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 344 नवीन रुग्ण, 283 जणांना डिस्चार्ज
पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आली आहे. परंतु मागील काही दिवसांपासून शहरामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा रुग्णांची संख्या अधिक आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 344 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 283 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 79 हजार 416 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 68 हजार 008 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 07 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 07 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8606 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6731 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
शहरामध्ये सध्या 2802 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 283 रुग्ण गंभीर आहेत,
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
