बिबवेवाडी – कोंढवा आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टराचा सन्मान
पुणे: डॉक्टरांनी कोविंड विरुद्धच्या लढाईत केलेल्या कामाबदल कृतज्ञता व्यक्त करत जागतिक डॉक्टर दिनानिमित्ताने येथील सुपर येथील आरोग्य उपकेंद्रात महानगरपालिकेतर्फे वतीने डॉक्टरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यावेळी महानगरपालिकेचे आरोग्य विभागातील अधिकारी दत्तात्रय जाधव राव हॉस्पिटलचे डॉक्टर श्रीधर जोशी, केदार गंगावणे, राहुल देवधर, ओमकार खांडे, राहुल सोनवणे, गणेश मदने, डॉ. सोनाली पार्थीकर उपस्थित होते.
दत्तात्रय जाधव म्हणाले, कोरोना काळात जगभरातल्या डॉक्टरांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता रुग्णसेवा केली आणि कोट्यावधी लोकांचा जीवाचं कोणी आजारी असेल तर त्याला पहिले डॉक्टरांची आठवण येते मरणाच्या दारात उभ्या असलेल्या लोकांना डॉक्टर हे जीवनदान देतात आपल्या देशात तर डॉक्टरांना देवाची रूप हे समजले जाते त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी आज देवदूतचा सन्मान केला जात आहे डॉक्टरांचे मनोधैर्य वाढेल.
डॉ. सोनाली पार्थीकर म्हणाल्या, महानगरपालिका आरोग्य विभाग एक जुलै रोजी देशभरातील महान डॉक्टर विधान चंदू राय यांचा जन्मदिवस पुण्यतिथी असते त्यांच्या स्मरणार्थ डॉक्टर दे म्हणून साजरा केला जातो आपल्या प्राणाची बाजी लावून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना आज दिवस समर्पित आहे कोरोना आजच्या काळात डॉक्टर सुनील चांगले काम केले आहे आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वांनी सविस्तरपणे काम केल्याने देशभरातून सर्व डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होत असून यामुळे आमच्यासारख्या सर्वच डॉक्टरांचे निश्चितच मनोधैर्य वाढत आहे.
