Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

दुःखद – ‘डॉक्टर्स डे’च्या दिवशीच नवविवाहित डॉक्‍टर दाम्पत्याची आत्महत्या

पुणे : शहरातील एका डॉक्‍टर दाम्पत्याने ऐन ‘डॉक्टर्स  डे’च्या दिवशी गळफास घेत आत्महत्या केली.   ही दुःखद घटना वानवडी येथे घडली असून याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

किरकोळ कौटुंबिक वादातून आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव डॉ.निखील शेंडकर (26) आणी पत्नी डॉ.अंकिता निखील शेंडकर(26) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार हे दाम्पत्य आझादनगर येथे रहाते. दोघांनीही बीएएमएसचे शिक्षण घेतले आहे.

निखील कासवती गावात प्रॅक्‍टीस करत होता. तर अंकिता देखील एका ठिकाणी प्रॅक्‍टीस करत होती. त्यांच्यामध्ये कौंटुंबिक वाद होत होते. बुधवारी निखील घरी येत असताना त्यांचा फोनवर वाद झाला होता.

निखील घरी आल्यावर त्याने पाहिले असता, अंकिताने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर निखीलनेही नैराश्‍यातून घरी गळफास घेत आत्महत्या केली. घटनास्थळी वानवडी पोलीस तपसा करत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading