टीसीएल ने लॉन्च केले भारतातील पहिले मिनी टीव्ही

पुणे : टीसीएल एक जागतिक टॉप-टू टेलिव्हिजन ब्रँड आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी असून त्यांनी नवीन २०२१ सी सीरीज रेंज लाइनअप टीव्ही लाँच केले आहे. यात उत्कृष्ट घरगुती मनोरंजन अनुभवासाठी मॅजिक कॅमेऱ्यासह मिनी एलईडी क्यूएलईडी ४ के  सी ८२५ , गेम मास्टरसह क्यूएलईडी   ४ के  सी ७२८ आणि व्हिडिओ कॉल कॅमेऱ्यासह  क्यूएलईडी ४के सी ७२५ यांचा समावेश आहे. नव्या मॉडेलमध्ये १२० एच झेड  एमईएमसी , डॉल्बी व्हिजन, डॉल्बी व्हिजन आयक्यू, डॉल्बी व्हिजन अॅटमॉस, आयमॅक्स  वर्धित, गेम मास्टर, हँड्स फ्री व्हॉइस कंट्रोल २.०, टीसीएल स्मार्ट यूआय आणि बऱ्याच इतर सुविधांचा समावेश आहे.

द अल्टिमेट एंटरटेनर- मिनी एलईडी   क्यूएलईडी   ४ के   अँड्रॉइड ११ टीव्ही सी८२५ मध्ये डॉल्बी व्हिजन एचडीआर आहे. हे टीव्ही ५५ आमि ६५ इंचप्रकारात उपलब्ध आहेत. द मल्टी टॅलेंट- व्हिडिओ कॉल  क्यूएलईडी   ४ के   अँड्रॉइड ११ टीव्ही सी ७२५टीव्ही मध्ये  स्मार्ट फीचरच्या बाबतीत,  सी ७२५   हा टीव्ही टीसीएल स्मार्ट यूआयसह ऑपरेट होतो. यात टीसीएल होम एंटरटेनमेंट सेंटरचा समावेश आहे. हा टीव्ही ५०, ५५ आणि ६५ इंच प्रकारात उपलब्ध आहे. द गेमिंग चँपियन- गेमिंग  क्यूएलईडी    ४ के  अँड्रॉइड  ११   टीव्ही  सी ७२५  मध्ये भव्य स्क्रीनवर उत्कृष्ट गेमिंगसाठी तयार केलेला  सी ७२५   हा टीव्ही सर्व गेमर्ससाठी टीसीएलची प्रीमियम ऑफरिंग आहे. या उपकरणात १२० एचझेड  एमईएमसी  ची सुविधा आणि यूझरच्या नियंत्रणासाठी टीव्हीला सोप्या आणि थेट व्हॉइस कमांड्सद्वारे हँड्स फ्री व्हॉइस कंट्रोलची सुविधा मिळते. हा टीव्ही ५५, ६५ आणि ७५ इंच प्रकारात उपलब्ध आहे.

या विषयी बोलताना टीसीएल इंडियाचे जनरल मॅनेजर माइक चेन म्हणाले, ‘सतत नूतनाविष्कार करून नव्या काळातील यूझर्सना आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सर्वोत्कृष्ट प्रदान करण्याच्या टीसीएलच्या वचनबद्धतेला नव्याने लाँच केलेली उत्पादने अधोरेखित करतात. सुरुवातीपासून, ब्रँडने सतत कामकाजात नावीन्य आणले असून आकर्षक सुविधा, किफायतशीर किंमतीत सर्वोत्कृष्ट उत्पादने पुरवत ग्राहकांना आश्चर्यचकित केले आहे. स्मार्ट टीव्ही पाहणे आणि गेमिंगसारख्या इतर गोष्टींसाठी विचार करताना, इतर ब्रँडच्या तुलनेत टीसीएलला प्राधान्य का द्यायचे, याची अनेक कारणेही ग्राहकांना मिळतील’.

Leave a Reply

%d bloggers like this: