महापालिकेत २३ गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयाचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले स्वागत; तसेच केली ‘ही’ मागणी

पुणे : पुणे महापालिका हद्दीत २३ गावे समाविष्ट करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिसुचना राज्य सरकारने बुधवारी काढली. यामुळे पुणे महापािलका ही राज्यातील सर्वांत माेठी क्षेत्रफळ असणारी महापालिका ठरली आहे, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ही गावे हद्दीत समाविष्ट केली जात असल्याने शहरातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या निर्णयाचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वागत केले त्याच बरोबर विकास कामांना चालना मिळावी यासाठी अर्थसहाय्य द्याव अशी मागणी यावेळी करण्यात आली.

२३ गावांच्या समावेशाबाबत महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे महापालिका राज्यातील सर्वात मोठी हद्द असणारी महापालिका झाली असताना या गावांचा सर्वांगीण आणि समतोल विकास करणे, याला आमचे प्राधान्य असेल. ३४ पैकी उरलेल्या २३ गावांचा समावेश व्हावा, ही आमची पूर्वीपासूनचीच मागणी होती.

या २३ गावांच्या समावेशाबाबत पुणे महापालिका प्रसाशनाला राज्य सरकारकडून अभिप्राय मागवण्यात आला होता. त्यानुसार या गावांसाठी ९ हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने कळविले होते. त्यानुसार राज्य सरकारने अर्थसहाय्यची तरतूद करावी, म्हणजे या गावांच्या विकासाला चालना मिळेल.

खरं तर ही गावे टप्प्या-टप्प्याने घ्यावीत अशी आमची भूमिका होती. म्हणूनच मा. देवेंद्रजींचे सरकार असताना २०१७ साली ११ गावांचा समावेश केला होता. आताही २३ गावांच्या समावेशाचे आम्ही स्वागतच करतो. पण त्यासोबतच गावांच्या विकासासाठी अर्थसहाय्य करावे. म्हणजे गावांच्या विकासाला लवकर गती देणे शक्य होईल.

Leave a Reply

%d bloggers like this: