Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

गणेशोत्सवासाठी राज्यसरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई: कोव्हिड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली आज जाहीर करण्यात आली. त्यामुळे मागील वर्षा प्रमाणे यंदाही सर्व नियम पाळून गणेशोत्सव साजरा करावा लागणारा आहे. यंदा देखील सार्वजनिक गणेशमंडळांना महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असणार आहे. तसेच सार्वजनिक गणेश मूर्तींची उंची ४ फूट तर घरगुती बाप्पाची मूर्तीची उंची २ फूट असावी असे आदेश काढण्यात आले आहे. याशिवाय, विसर्जन देखील कृत्रिम तलावात करावे आणि शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती बसवावी असेही सांगण्यात आले आहे.

गणेशोत्सव नियमावलीतील काही मुद्दे 

  • कोविड- १९ मुळे महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाच्या धोरणाशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारावेत.
  • सार्वजनिक गणेशमंडळांना महापालिका किंवा स्थानिक प्रशासन यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक
  • या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.
  • श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपतीकरिता २ फूटांच्या मर्यादेत असावी.
  • या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील पातू किंवा संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. अथावा शाडूची मूर्तीची स्थापना करावी.
  • गणेश मूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात
  • जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे, तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम शिबीरे आयोजित करावीत

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading