Pune – बिबवेवाडी येथे मोफत लसीकरण केंद्राचे उद्घाघटन

पुणे: कोरोना विषयानुसार वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रभाग क्रमांक 37 बिबवेवाडी सुपर येथील ज्येष्ठ विरंगुळा केंद्र सुपर या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून स्थानिक नगरसेविका रुपाली धाडवे यांच्या प्रयत्नातून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.

या केंद्राचे उद्घाघाटन पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते, महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेविका रूपाली धाडवे , बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय सहायक आयुक्त प्रज्ञा पवार आणि वैद्यकीय अधिकारी विद्या नागमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी सुधीर धाडवे, अभिजित देशमुख, अजय भोकरे, देवदास मोरे ,उमेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. येथे नागरिकांसाठी मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन कोविड विरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हावे. रूपाली धाडवे यांनी प्रभागात असेच काम करत राहावे,

आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, आमच्या मतदार संघात लहानश्या वत्यात लसीकरण होत आहे याचा मला खूप आनंद होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत. रूपाली धाडवे यांनी प्रभागातील नागरिकांसाठी कोरोना काळात खूप मदत केली आहे त्यांनी त्यांचे काम कसे चालू आहे चालू ठेवावे .

Leave a Reply

%d bloggers like this: