Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

Pune – १ जुलैला संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार


पुणे: पुणे शहरातील सर्व भागात गुरूवार १ जुलै रोजी  संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीुपरवठा होणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.


पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पर्वती जलकेंद्र पंपींग, रॉ वॉटर पंपींग, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर, एस़एनडी़टी़/वारजे जलकेंद, नवीन होळकर भामा आसखेड, चिखली रावेत पंपींग येथील विद्युत व पंपींग विषय तसेच बांधकाम विषयक तातडीची दुरूस्तीची कामे करायची असल्या कारणाने १ जुलै रोजी संपूर्ण पुणे शहराचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.


पाणीपुरवठा बंद असणारा भाग
– भामा आसखेड जलकेंद्र परिसर :- लोहगाव, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा
– पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपींग) :- शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एस़एऩडी़टी़ परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड आदी सर्व भाग
– वडगाव जलकेंद्र परिसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक
– चतु:श्रृंगी / एस़एऩडी़टी़ / वारजे जलकेंद्र परिसर :- पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधान, बाणेर, चांदणी चौक परिसर, भुसारी कॉलनी, महात्मा सोसायटी, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, बावधान, सुस, सुतारवाडी, भूगाव रस्ता
– लष्कर जलकेंद्र भाग :- लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता
– नवीन होळकर व चिखली पंपींग भाग :- विद्यानगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव, मुळा रोड

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading