Friday, June 19, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

इगतपुरीतील रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, 12 माहिलांसह २२ जण ताब्यात

इगतपुरी : इगतपुरी हे पावसाळ्यातील निसर्गरम्य ठिकाण. परंतु आज (दि.२७) पहाटे येथे एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून 12 माहिलांसह 22 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. या रेव्ह पार्टीत पोलिसांना आमली पदार्थांसह आक्षेपार्ह आवस्थेत तरुण असल्याचे आढळून आले.
ताब्यात घेतलेल्यांमध्ये एक विदेशी महिला, मराठी व दक्षिणात्य चित्रपट क्षेत्रात काम करणार्‍या पाच अभिनेत्री, २ कोरियोग्राफरसह बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या एका महिलेचाही समावेश आहे. या रेव्ह पार्टीसाठी अमली पदार्थ कोठून आणले. याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले असून मुंबईमधून नायजेरियन नागरिकास चौकशी ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरीतील दोन शेजारी शेजारी असलेल्या बंगल्यांमध्ये उच्चभ्रू वस्तीतील पुरुष व महिला अवैधरित्या रेव्ह पार्टी करत असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी स्काय ताज व्हीला व स्काय लगून व्हीला येथे छापा टाकला. छाप्यात पोलिसांनी ड्रग्ज व हुक्क्याचे सेवन करताना मद्यधुंद अवस्थेत २२ जण आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरुन केकेन इतर अंमली पदार्थ जप्त केले. पोलिसांनी 22 जणांना ताब्यात घेतले. यामध्ये १० पुरुष व १२ महिलांचा समावेश आहे. शिवाय पोलिसांनी स्काय ताज व्हीला व स्काय लगून व्हीला येथील कर्मचार्‍यांना ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading