परभणी – भाजपच्या वतीने कोविड योध्यांचा सत्कार सोहळा संपन्न

परभणी : येथे आमदार मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संजय बेटकर, संघटन सरचिटणीस आकाश लोहट, शिवाजीराव शेळके,यांच्या नेतृत्वात भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दैवत लाटे यांच्या संकल्पनेतून कोविड योध्यांचा यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष डॉ विद्या चौधरी, तर प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन जोगदंड, नगरसेवक सुशील कांबळे, किसान मोर्चाचे ब्रह्मानंद सावंत, विजयराव ठमके, नागवंशी प्रतिष्ठान सचिन पाचपुंजे, रयत मदत केंद्राचे बबन मुळे ,लखन जामकर, राहुल लाटे ,दिलीप काळदाते, प्रभाकर वाघ, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कोवीड-१९ या काळामध्ये जे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमात विठ्ठल कांगणे, दिलीपराव देशमुख , ब्लड राजा ग्रुपचे लखन जामकर जयश्री देशमुख मॅडम ,पुनम मठपती ,कविता  शिंदे, जायभये मॅडम ,डॉ बी आर करंजकर ,डॉ चोपडे , डॉ दुर्गासिंग गौतम , डॉ दिगंबर गुंगे ,ज्येष्ठ पत्रकार राजेश बालटकर ,उपसरपंच महेश मठपती ,उपसरपंच मारुती पांढरे, राहुल तालेवार, अशोक जगाडे, प्रभुदेवा जगाडे, उमेश आंबेकर नारायण गवळी ,बाळू साळवे, पोलीस पाटील नवले, राजेभाऊ अब्दागिरी, निलेश आंबेकर, गौतम ढाले ,उमेश आंबेकर ,दीपक प्रधान ,यांनी कोवीड च्या काळामध्ये उल्लेखनीय कार्य केलं त्याबद्दल त्यांचे  दैवत लाटे यांच्या संकल्पनेतून प्रमाणपत्र देऊन तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

Leave a Reply

%d bloggers like this: