“स्वकाया” होलिस्टिक हीलिंग सेंटर लवकरच पुणेकरांसाठी खुले
आज समाजास शरीराच्या ,मनाच्या आणि भावनांच्या व्यापक चिकित्सेची गरज आहे. अनेकदा ही चिकित्सा पद्धत्ती न परवडणारी असते. याची दाखल घेवून लिपी खेमका यांनी ‘स्वकाया’ हे होलिस्टिक हीलिंग सेंटर सुरू करण्याचा निश्चय केला आहे. जिथे त्या अत्यंत वाजवी दरात चिकित्सापद्धत्ती सर्वांसाठी उपलब्ध असतील. स्वकाया लवकरच पुणेकरांसाठी खुले असेल.
स्वकायाच्या संस्थापीका लिपी खेमका म्हणतात , मूलभूत सुसंवाद अशी गोष्ट आहे जी प्रत्येकासाठी आवश्यक आहे, याच दृष्टीकोणातुन आणि माझ्या आवडीमुळे त्यास अश्या व्यासपीठावर आणण्याचा मी दृढ निश्चय केला आहे जिथे सर्वांचे स्वागत आहे. आनंद म्हणजे वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळी गोष्ट असते. तरीसुद्धा, त्याची मुळे नेहमीच मन, शरीर व भावनांने एकत्र येणार्या आनंदाशी खोलवर जोडलेली असतात. ज्या ठिकाणी कोणतेही प्रश्न अनुत्तरीत नसतात आणि जिथे आरोग्यास प्राधान्य दिले जाते अशी जागा तयार करण्याच्या त्यांच्या आवडीमुळेचे स्वकायाचा जन्म झाला, ज्याचा अनेकांना लाभ घेता यईल मिळेल. बोट क्लब रोड येथील ‘स्वकाया होलिस्टीक सेंटर’ आहे. येथे नैसर्गिक, प्राचीन आणि आधुनिक वैकल्पिक उपचार एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
