पुणे विभागातील 15 लाख 95 हजार 7 कोरोना बाधित रुग्ण बरे -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे : पुणे विभागातील 15 लाख 95 हजार 7 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 16 लाख 66 हजार 936 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 37 हजार 290 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 34 हजार 639 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.08 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.68 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 40 हजार 750 रुग्णांपैकी 10 लाख 14 हजार 326 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 911 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 513 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.46 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 86 हजार 336 रुग्णांपैकी 1 लाख 73 हजार 370 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 531 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 435 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 60 हजार 491 रुग्णांपैकी 1 लाख 53 हजार 985 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 170 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 336 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 36 हजार 959 रुग्णांपैकी 1 लाख 24 हजार 613 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 437 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 909 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 42 हजार 400 रुग्णांपैकी 1 लाख 28 हजार 713 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 241 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 446 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 2 हजार 897 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 636, सातारा जिल्ह्यात 319, सोलापूर जिल्ह्यात 201, सांगली जिल्ह्यात 801 तर कोल्हापूर जिल्ह्यात 940 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 4 हजार 897 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 381, सातारा जिल्हयामध्ये 273, सोलापूर जिल्हयामध्ये 439, सांगली जिल्हयामध्ये 952 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 852 रुग्णांचा समावेश आहे.

विभागातील लसीकरणाचे प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 32 लाख 59 हजार 670, सातारा जिल्ह्यामध्ये 8 लाख 24 हजार 551, सोलापूर जिल्हयामध्ये 6 लाख 66 हजार , सांगली जिल्हयामध्ये 7 लाख 60 हजार 420 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 12 लाख 30 हजार 39 नागरिकांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 4 हजार 736 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 16 लाख 66 हजार 936 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: