एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसतर्फे बी.ए आणि एम.ए एडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रम सुरू
पुणे: एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, लोणी काळभोर येथील “एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस” विद्याशाखेतर्फे बी.ए. एडमिनिस्ट्रेशन आणि एम.ए. एडमिनिस्ट्रेशन या दोन अभ्यासक्रमाची सुरूवात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात आली आहे. अशी माहिती एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस विद्याशाखेचे संचालक सुजित धर्मपात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सुजित धर्मपात्रे म्हणाले, एमआयटी आर्ट डिझाइन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्यातर्फे स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकिय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावी नंतर बी.ए. एडमिनिस्ट्रेशन ही पदवी आणि पदवीनंतर एम.ए. एडमिनिस्ट्रेशन हा पदव्युत्तर अभ्यासक्रम देणारी “स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस” ही विद्याशाखा विद्यापीठात सुरू केली आहे. बारावीनंतर विद्यार्थ्यांची बी.ए./एम.ए. या अनुक्रमे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमादरम्यानच यूपीएससी व राज्य पीएससी यांची तयारी करून घेतली जाणार आहे.
प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, देशाच्या उभारणीसाठी युवकांना तांत्रिक ज्ञानासोबतच मुल्याधिष्ठीत शिक्षण देण्यासाठी आम्ही कठीबद्ध आहोत. एमआयटी एडीटी विद्यापीठात मोठ्या प्रमाणात कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात येते. या वर्षापासून “एमआयटीस्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस” या विद्याशाखेच्या माध्यमातून लोकसेवा सर्व्हिसेस करण्याची इच्छा असणाऱ्य़ा विद्यार्थ्यांना घडविण्याचा आमचा मानस आहे.
