महिंद्रा तर्फे नवीन BSIV बांधकाम उपकरणांची मालिका सादर
पुणे : महिंद्रा समूहाचा एक भाग असणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज त्यांच्या बांधकाम उपकरण व्यवसायाच्या अंतर्गत नवीन BSIVसहित मोटर ग्रेडर महिंद्रा रोड मास्टर जी ९०७५ आणि जी ९५९५ आणि बॅकहो लोडर – महिंद्रा अर्थ मास्टर एसएक्स व्हीएक्स यांच्याजोडीला त्यांची BSIVसह असलेली बांधकाम उपकरणे सादर केली.
यावेळी बोलताना महिंद्रा ट्रक आणि बस आणि बांधकाम उपकरण व्यवसाय प्रमुख जलाज गुप्ता म्हणाले, आम्ही आता महिंद्रा अर्थ मास्टर बॅकहो लोडर्सची आमची नवीन BSIV मालिका सादर करत आहोत. आमच्या ग्राहकांना तुलनेने कमी खर्चात सर्वोत्तम उत्पादन सुविधा देऊन त्यांची उत्पादन क्षमता आणि फायदा यांच्यात वाढ करणे हे आमचे ध्येय आहे. बांधकाम उपकरण व्यवसायक्षेत्रासाठी असलेल्या नवीन वायू उत्सर्जन नियमांना अनुसरून आज आम्हांला महिंद्रा रोड मास्टर मोटार ग्रेडर्स साठीही आमची BSIVसहित असलेली मालिका सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. ग्राहकांच्या गरजा व्यवस्थित समजून घेतल्यानंतर या मजबूत आणि विश्वासार्ह उत्पादनांची रचना आणि विकास भारतात करण्यात आला आहे. या संपूर्ण एमसीई BSIV मालिकेत मजबूत आयमॅक्स सुविधा असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांची कार्ये अधिक चांगली करता येतील आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी संभाव्य, लक्षणसूचक आणि अचूक वेगवान व्यवस्थापन करता येईल.
महिंद्रा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट (एमसीई) ही भारतीय बांधकाम उपकरणे उत्पादक कंपनी आहे. बॅकहो लोडर्स, अर्थ मास्टर, मोटर ग्रेडर्स, रोड मास्टर्स (१७ टक्के बाजारपेठीय हिसा) अशा विविध पुरस्कारप्राप्त उत्पादनांची निर्मिती एमसीई करते. सध्या ७००० हून अधिक अर्थ मास्टर आणि सुमारे ७०० रोड मास्टर आपल्या अहोरात्र चालणाऱ्या अत्युच्च कामगिरीद्वारे ग्राहकांना संतुष्ट करत असून परिसर व पर्यावरणात अधिक समृद्धीला चालना देत राष्ट्रबांधणीचे कार्य निष्ठेने करत आहेत.
