Friday, May 29, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

राष्ट्रवादी कार्यालय उद्घाटन गर्दी प्रकरणी अजित पवारांवर गुन्हा दाखल करा वंचित बहुजन आघाडीची मागणी

पुणे ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी झाले. या कार्यक्रमात कोरोनाची नियमावली पायदळी तुडवण्यात आली, या प्रकरणात काही लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र उपमुख्यमंत्र्यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणात अजित पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

या पत्रकार परिषदेला राज्य उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे, शहर प्रवक्ते संजय  गायकवाड, शहराध्यक्ष प्रफुल्ल गुजर आदी उपस्थित होते.

अनिल जाधव म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सारखे जनतेला सांगत असतात कोरोना चे नियम पाळा, काम असेल तरच बाहेर पडा शनिवारी पवार यांनी पुण्यात कोरोना आढाव बैठक घेतली व माध्यमासमोर पुण्यात विकेंड लॉक डॉऊन आहे असे सांगितले. तसेच पुण्याच्या बाहेर  जाणाऱ्या पर्यटकांना महाबळेश्वर, लोणावळा येथे  आयसोलेशन करण्यात येईल असे सांगितले. परंतु त्यांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांकडून जमावबंदी कायद्या मोडला गेला, सर्वसामान्य नागरिकांना वेगळे नियम आणि अजित पवारांना वेगळा न्याय असू शकत नाही, अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी स्वस्थ बसणार नाही असेही जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading