Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNE

एसएनबीपी महाविद्यालयात योग दिनाच्या निमित्ताने प्रात्यक्षिके

पुणे : जागतिक योग दिनाच्या निमित्ताने एसएनबीपी कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवस्थापन महाविद्यालयात विविध योग प्रत्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमात महाविद्यालयातील विविध विभागाचे विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, प्राचार्य तथा संचालक सहभागी झाले होते. या उपक्रमात कोविडचे सर्व नियम पाळताना उपस्थितांनी प्रात्यक्षिके केली.

यावेळी एसई सोसायटीच्या संचालिका डॉ. वृषाली भोसले, डॉ. डी के भोसले, कॅम्पस संचालिका ऋतुजा भोसले यांनी मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाच्या नियोजनात उपप्राचार्य डॉ. सुधीर आतवाडकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी फिरोज शेख, प्रा. उमेश्वरी पाटील व प्रा. दानिश सय्यद यांनी सूत्रसंचालन करत आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading