Weekend Lockdown – महापौरांच्या आदेशाला पुण्यातील व्यापाऱ्यांची केराची टोपली

पुणे: महापौरांनी काल रात्री पुण्यातल्या unlock बाबत एक नवीन आदेश काढला शनिवार-रविवार फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी देण्यात आली तरी पुण्यातील व्यापाऱ्यांनी महापौरांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत किरणा माल, कपड्याची , ज्वेलरीची दुकाने आदि अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सुरूच ठेवली होती.

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येवू घातली आहे या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिका हद्दीत शनिवार-रविवार विकेंड लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला. 
फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी देण्यात आली गेल्या 2 महिन्यापासून पुण्यातील दुकाने बंद होती आता कुठेतरी शासनाने दुकाने सकाळी 7 ते सध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने उघडा यला परवानगी देण्यात आली होती व्यापाऱ्यांचे टाळे बंदी व कोरोनामुळे खूप नुकसान झाले आहे काल महापौरांनी शनिवार-रविवार दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्या मुळे व्यापारिवर्ग चिंतेत पडला आहे व्यापाऱ्यांनी ठरवलेले दिसते की काही लॉक डाऊन बाबत निर्णय झाला तरी दुकाने चालू ठेवायची महापालिका या दुकाना वर कारवाई करणार का हे बघावे लागेल महापौरांच्या आदेशाला पुण्यातील व्यापाऱ्यांची केराची टोपली दिली असल्याचे दिसून आले.

Leave a Reply

%d bloggers like this: