वंदे मातरम् संघटनेच्या आंदोलनानंतर एसपीएमच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल

पुणे : शिक्षण प्रसारक मंडळी (एसपीएम) मधील विद्यार्थ्यांनी संपूर्ण फी भरण्यासाठी पालकांवर दबाव आणला जात असून त्याशिवाय परीक्षेचा निकाल देत नसल्याचे लक्षात आल्यावर वंदे मातरम संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यानंतर शिक्षण प्रसारक मंडळीच्या वतीने विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल देण्यात आला. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण प्रसारक मंडळीचे एस. के. जैन यांच्याशी देखील पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

या आंदोलनाच्या वेळी ज्येष्ठ समाजसेविका सरुताई वाघमारे, वंदे मातरम् संघटना महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे, अध्यक्ष वैभव वाघ, पुणे शहराध्यक्ष महेश बाटले, महिला संपर्कप्रमुख शितल नलावडे, राकेश तेलंगे,अंकित दुरकर, हेमंत कुंभार, शनिजय काळे व वंदे मातरम् संघटनेचे इतर पदाधिकारी, महिला व शाळेचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सचिन जामगे म्हणाले, शिक्षण प्रसारक मंडळी या खाजगी शाळेमध्ये नर्सरी ते  दहावीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील १५ महिने कोरोना महामारीचा सामना सर्वजण करीत आहेत. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांच्या नोकऱ्या, व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. अशा परिस्थितीत संस्थेच्या प्राचार्य रमा कुलकर्णी तसेच शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष मिहिर प्रभुदेसाई पालकांना जबरदस्तीने फॉर्म भरून १००% फी भरण्यासाठी काही दिवसांची फक्त मुदत देत आहेत. फी मध्ये सवलत देखील दिली जात नाही.

मागील पंधरा महिने विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची ३०-४०% फी माफ करावी. अशी मागणी पालकांनी केली, तरी प्राचार्य रमा कुलकर्णी व मिहीर प्रभुदेसाई हे पालकांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. दोघांच्या राजीनाम्याची मागणी देखील पालकांच्या वतीने करण्यात आली आहे, अन्यथा आठ दिवसानंतर आंदोलनाचे स्वरूप तीव्र, असे संघटनेमार्फत सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: