फुटबॉलपटू रोनाल्डोच्या ‘किक’चा कोका-कोला कंपनीला तब्बल 29 हजार कोटींचा दणका

नवी दिल्ली : पोर्तुगालचा स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या एक वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. रोनाल्डोलाने युरो कप दरम्यान पत्रकार परिषदेत कोका कोलाच्या दोन बाटल्या आपल्या समोरच्या टेबलवरून हटवल्या आणि कोका कोला कंपनीला तब्बल 29 हजार कोटी रुपयांचा दणका बसला आहे.

युरो कपचा गतविजेता पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कोल्ड ड्रिंकच्या बाटल्या पाहून चिडला. त्याने आपल्या समोर कोको कोलाच्या बाटल्या पाहून नाराजी व्यक्त केली. रोनाल्डोने रागात म्हटले की कोल्ड ड्रिंक नव्हे तर आपल्याला पाणी पिले पाहिजे. परंतु रोनाल्डोच्या या 10 सेकंदाच्या कृतीनंतर कोका कोलाचे शेअर घसरण्यास सुरवात झाली. रोनाल्डोच्या या कृतीनंतर कोका कोलाचे अंदाजे 4 बिलियन डॉलर पर्यंत शेअर घसरले.

युरोपात शेअर मार्केट सुरू झाले. त्यावेळी कोका कोलाच्या शेअरचा दर 56.10 डॉलर एवढा होता. अर्ध्या तासानंतर रोनाल्डोची पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर लगेच कोका कोलाचे शेअर घसरण्यास सुरुवात झाली. कोका कोलाचे शेअर 55.22 डॉलर पर्यंत पोहचले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: