‘लीवा मिस दीवा २०२१’साठी घरबसल्या ऑडिशन अर्ज भरा

पुणे : सौन्दर्य स्पर्धेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘लीवा मिस दीवा २०२१’ या स्पर्धेच्या नवव्या सीजनची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 20 जुलै 2021पर्यंत मुदत असून www.missdiva.com या संकेतस्थळावर लॉग इन करून नावनोंदणी करता येणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत पहिल्यांदाच ट्रान्सवीमेन यांना देखील सहभागी होता येणार आहे.   

या स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी १८ ते २७ वर्षे (३१ डिसेंबर २०२१ पर्यंत २७ वर्ष पूर्ण असावे) असलेल्या तरुणी तसेच ट्रान्सवीमेन देखील अर्ज करू शकतात. अर्जदार युवती अविवाहित असावी, तर तिची उंची ५. ४ किंवा त्याहून जास्त असणे अपेक्षित आहे. भारतीय पासपोर्ट धारकओसीआय कार्ड धारक आणि एनआरआय हे रनर अप स्थानांसाठी स्पर्धेत दाखल होऊ शकतात. त्यानंतर , निवडलेल्या अंतिम २० स्पर्धकांना मुंबई येथे प्रशिक्षण देऊन त्यांचे ग्रूमिंग करण्यात येईलह्या सर्व स्पर्धक तरुणी ऑक्टोबर २०२१ मध्ये होणार्‍या ग्रँड फिनालेत प्रतिष्ठित मुकुटासाठी स्पर्धेत उतरतील.

या स्पर्धेत मिस दीवा चे शीर्षक प्रायोजक म्हणून ‘लीवा’ असणार आहे. तर एमएक्स टकाटक हे या स्पर्धेत ऑडिशन देण्यासाठी प्रवेशद्वाराचे काम करणार आहे. या सौंदर्य स्पर्धेचा ग्रँड फिनाले एमटीव्ही चॅनेल वर प्रसारित होईल.अलीकडेच लीवा मिस दीवा २०२०  जिंकणार्‍या अॅडलाइन कॅसलीनो ने मिस युनिव्हर्स २०२० मध्ये चौथे स्थान पटकावले आहे. त्यामुळे येणारी स्पर्धा खूप आकर्षक असणार आहे.  

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: