दुहेरी खून प्रकरणी पित्याचा शोध सुरू

पुणे – मायलेकराचा खून करुन त्यांचे मृतदेह वेगवेगळया ठिकाणी टाकल्याप्रकरणी पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले आहेत. पोलिसांनी मुलाच्या पित्याचा युध्दपातळीवर शोध सुरु केला आहे. मुलगा ऑटिझमग्रस्त असल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी सासवड आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयान शेख (6) व आलिया शेख(35) असे खून झालेल्या मायलेकरांची नावे आहेत. तर आबिद शेख याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सात पथके रवाना झाली आहेत. आबिद शेख एका खासगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होता. तो मार्केटयार्ड येथे गाडी सोडून स्वारगेटच्या दिशेने चालत जाताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शेख कुटूंब मुळचे मध्य प्रदेशातील आहे. ते 2007 पासून नोकरीनिमीत्त पुण्यात रहात होते. सध्या ते धानोरीतून चऱ्होलीमध्ये रहायला आले होते. आबिदा शेख याही एका खासगी कंपनीत काम करत होत्या. मात्र मुलाचा संभाळ करण्यासाठी त्यांनी अडीच वर्षापूर्वी नोकरी सोडली होती.

मुलगा ऑटिझमग्रस्त असल्याचे लक्षात आल्यावर कुटूंब तणावात होते. मागील काही महिण्यापासून मुलाला शिकवण्यासाठी घरी एक शिक्षीकाही ठेवण्यात आली होती. आलिया शेख यांचे वडिल मध्य प्रदेशात वनाधिकारी होते, तर आबिद शेख याचे वडिल जिल्हा योजना नियोजन अधिकारी होती. त्याचा भाऊ कॅनडामध्ये रहात आहे.

आबिदने गाडी भाड्याने घेतली होती. तो सलग 11, 12, 13 आणी 14 जून रोजी सलग घरातून बाहेर कुटूंबाला घेऊन जात होता. सकाळी फिरायला गेल्यावर संध्याकाळी कुटूंब पुन्हा घरी येत होते. मात्र 14 जून रोजी आबिद कुटूंबाला घेऊन सासवड-दिवेघाट-बनेश्‍वर-बोपदेव घाट- दिवे घाटातून पुन्हा सासवडला गेला.

तेथे त्याने रात्री साडेआठच्या सुमारास गाडीतच आलियाचा खून केल्याची शक्‍यता आहे. आलियाचा मृतदेह सासवड पोलिसांना सापडला होता. यानंतर त्याने गाडी पुन्हा कात्रज- दत्तनगर चौक-कात्रज नवा बोगदा येथे नेली. तेथे मुलाचा खून करुन त्याचा मृतदेह टाकला असावा. यानंतर 15 तारखेला पहाटे एक वाजता त्याने गाडी मार्केट यार्ड येथे सोडली. तेथे गाडीतून उतरुण स्वारगेटच्या दिशेने चालत जाताना तो सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पोलिसांना गाडीमध्ये दोन लोखंडी पाण्याचे पाईप सापडले आहेत. सोबतच मुलाचे कपडे व खाण्याचे साहित्य आहे. मागच्या सीटवर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते. तसेच गाडीमध्ये तीघांव्यतिरीक्त आणखी कोणी नसल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. यामुळे संशयाची सुई आबिदकडे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जो पर्यंत आबिदचा हाती येत नाही तो पर्यंत घटनेचा उलगडा होणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान आलियाच्या शवविच्छेदनाच्या अहवालात तीला जबर मारहाण केल्याने तर अयानच्या शवविच्छेदनाच्या अहवालात गळा दाबला गेल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: