कष्टकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही तर उद्रेक होईल – बाबा कांबळे

पिंपरी – रिक्षा चालक ,फेरीवाले ,घरकाम महिला गटाई कामगार यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आज कष्टकरी जनता आघाडी वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका समोर मनपासमोर आंदोलन आंदोलन करण्यात आले ,

धुणीभांडी स्वयंपाक करणाऱ्या महिला रिक्षाचालक ,फेरीवाले , गटई कामगार जिम ट्रेनर यांना तीन हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे, परंतु मनपा आयुक्त आणि त्याचे प्रशासन या योजनेत खोडा आणत आहेत, मनपाच्या या लहरी कारभाराविरोधात कष्टकरी जनतेच्या वतीने आज सकाळी 11 वाजता पिंपरी चिंचवड मनपा कार्यालयासमोर आंदोलन केले गेले. बाबा कांबळे यांच्या नेतूत्वा खाली हे आंदोलन करण्यात आले ,

करत कष्टकरी जनता आघाडी, महाराष्ट्र रिक्षा पंचायत ,टपरी ,पथारी, हातगाडी पंचायत, घरकाम महिला सभा,रिक्षा ब्रिगेड वतीने हे आंदोलन करण्यात आले

आंदोलनात घरकाम महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे कष्टकरी जनता महिला आघाडी अध्यक्षा अनिता सावळे, टपरी पथारी हातगाडी पंचायत प्रल्हाद कांबळे, कार्याध्यक्ष बळीराम काकडे , शहराध्यक्ष रमेश शिंदे , महाराष्ट्र रिक्षा पंचायत उपाध्यक्ष लक्ष्मण शेलार , रिक्षा ब्रिगेडचे प्रमुख बाळासाहेब ढवळे, शहराध्यक्ष धनंजय कुदळे, विजय ढगारे, अविनाश जोगदंड, लक्ष्मण शेलार,तुषार लोंढे, जाफर भाई शेख, सिद्धेश्वर सोनवणे ,सुरज सोनवणे ,अजय साळवे, प्रदीप अहिरे ,नंदलाल निकम आदी सहभागी उपस्थित होते

कोरोना मुळे आर्थिक अडचणी मध्ये आलेले गोर-गरीब आर्थिक दुर्बल घटकांना तीन हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला परंतु अशी मदत करता येणार नाही असे मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी जाहीर केले यामुळे कष्टकरी बहुजन मागासवर्गीय जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून आमच्या गरीबीची थट्टा केली जात असून आम्ही आर्थिक अडचणी मध्ये असताना आम्हाला हिणवले जात आहे आमचा अपमान केला जात आहे. आम्ही कष्टकरतो, सन्मानाने जगतो आम्हाला कमजोर समजू नका अन्यथा आयुक्त राजेश पाटील यांनी शिष्टमंडळाची भेट नाकारली , हा आयुक्तांची मग्रुरी पणा चालणार नाही त्याच्या डोक्यात अजूनही पाटीलकिचा रुबाब धखवत आहेत , जातीवाद करत आहेत हा मागासवर्गीय बहुजन जनतेवर अन्यय असून हा एक जातीवादी आहे, असाआरोप केला हि महागात पडेल असा इशारा , यावेळी बाबा कांबळे यांनी दिला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: