पुणे शहर काँग्रेस तर्फे छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम

पुणे: पावसाळ्यात छत्रीची गरज लक्षात घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी छत्री मोफत दुरुस्त करुन देण्याचा उपक्रम पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने हाती घेतला असून त्याचा शुभारंभ सोमवार दिनांक १४ जून रोजी दुपारी दोन वाजताकाँग्रेस भवन येथे करण्यात येईल, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

हा उपक्रम सोमवार दिनांक १४ जून पासून शुक्रवार दिनांक १८ जूनपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळात काँग्रेस भवनात चालू राहील. छत्री दुरुस्तीसाठी कारागीर नेमण्यात आलेले आहेत. तसेच गरजेनुसार शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम यापुढेही राबविला जाईल, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

पावसाळ्यात छत्रीची गरज असते मात्र, अनेकदा छत्री मोडते आणि तिच्या दुरुस्तीसाठी कारागिरांची शोधाशोध करावी लागते. नादुरुस्त छत्री टाकून देणे परवडत नाही अशावेळी मोठी पंचाईत होते. याकरिता नादुरुस्त छत्र्या मोफत दुरुस्त करुन देण्याचा उपक्रम काँग्रेस पक्षातर्फे हाती घेण्यात आला आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मोहन जोशी यांनी केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: