विश्व मराठी एकांकिका स्पर्धेत महाराष्ट्र मंडळ अबुधाबीची ‘लॉटरी’ प्रथम
पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज डिस्ट्रीक्ट 3131 आयोजित विश्व मराठी एकांकिका स्पर्धेत महाराष्ट्र मंडळ अबुधाबीची ‘लॉटरी’ ही एकांकिका प्रथम पारितोषिकाची मानकरी ठरली तर यूएसएतील डीएफडब्ल्यू थिएट्रॉन्सची ‘द शेक्सपीअर एक्सपेरिमेंट’ आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इंडियन थिएटरची ‘बंदिनी’ या एकांकिकांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पारितोषिक मिळाले.
रोटरी क्लबच्या लीना गोगटे आणि अविनाश ओगले यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या विश्व एकांकिका मराठी स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. जगभरात कोरोनाचे सावट असतानाही अमेरिका, अबुधाबी, न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया अशा जगभरातील विविध 17 संघांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदविला. स्पर्धेचा निकाल आज (दि. 13 जून 2021) ऑनलाईन माध्यमाद्वारे जाहीर करण्यात आला. या पारितोषिक वितरण समारंभाला स्पर्धेतील सहभागी संघांनी एकाचवेळी हजेरी लावली. यूएसएतील बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विद्या जोशी (शिकागो) प्रमुख पाहुण्या होत्या. रोटरी क्लबच्या डिस्ट्रीक्ट गर्व्हनर रश्मी कुलकर्णी अध्यक्षस्थानी होत्या. रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे अध्यक्ष विनय नेवसे, उपाध्यक्ष विनायक पेठे, सचिव विवेक जोशी यांची उपस्थिती होती. व्हिडिओ स्वरूपात सादरीकरण झालेल्या या एकांकिकांचे परिक्षण दीपक रेगे आणि उल्हास आढाव यांनी केले.
जगाच्या कानाकोपर्यात वास्तव्यास असूनही आपली मराठी संस्कृती जोपासणार्या हौशी कलाप्रेमी नाट्यरसिकांच्या कलाकृतींना हक्काचा रंगमंच मिळावा म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती अध्यक्ष विनय नेवसे यांनी दिली. ग्लोबल ग्रांट प्रोजेक्टच्या अंतर्गत ससून हॉस्पिटलमध्ये बालरुग्ण विभागात श्वसनाच्या संबंधीत अद्यावत उपकरणे ह्यावर्षी दिली जाणार आहेत. ही उपकरणे बालरुग्णांमध्ये पोस्ट कोव्हिडमधील उपचारासाठी खूप उपयुक्त असल्याचे नेवसे म्हणाले. निकालाची घोषणा श्रीकांत कानेटकर आणि सुनीता ओगले यांनी केली. विनायक पेठे यांनी आभार मानले. अविनाश ओगले आणि लीना गोगटे यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. विद्या जोशी म्हणाल्या, परदेशात राहूनही अनेक मुले मराठीचे धडे गिरवत आहेत. प्रत्येक मुलाला पु. ल. देशपांडे होता आले नाही तरी पुलं कळावेत या हेतूने रोटरीच्या माध्यमातून परदेशातील मुलांसाठी बालनाट्य एकांकिका स्पर्धांचे आयोजन केले जावे. बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे कलागुणांची देवाण-घेवाण व्हायी यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
सांघिक पारितोषिक ; प्रथम – लॉटरी (महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी), द्वितीय – द शेक्सपीअर एक्सपेरिमेंट (डीएफडब्ल्यू थिएट्रॉन्स, यूएसए), तृतीय – बंदिनी (मेलबर्न इंडियन थिएटर, ऑस्ट्रेलिया), उत्तेजनार्थ – हो मालक (कला भवन, यूएसए), मेला तो देशपांडे (महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी), सख्खे शेजारी (कला निर्मिती, वॉशिंटन डीसी, यूएसए), वॉस्टअॅप युनिर्व्हसीटीत अडकलेली म्हातारी (एलएमएनओपी, लॉस एंजेलिस, यूएसए). लक्षवेधी एकांकिका – आम्हाला काही सांगायचय (कला निर्मिती वॉशिंग्टन डीसी, यूएसए).
उत्कृष्ट दिग्दर्शन : प्रथम – सुचिता कडाळे (लॉटरी, महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी), द्वितीय – अमित श्रृंगारपुरे-पाटील (द शेक्सपीअर एक्सपेरिमेंट, डीएफडब्ल्यू थेट्रॉन्स, यूएसए), तृतीय – निलेश गद्रे (बंदिनी, मेलबर्न इंडियन थिएटर, ऑस्ट्रेलिया), उत्तेजनार्थ – सुजाता देशमुख (सख्ख्ये शेजारी, कला निर्मिती, वॉशिंटन डीसी, यूएसए), संजय चौलकर (मेला तो देशपांडे, महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी).
उत्कृष्ट अभिनय (पुरुष गट) : प्रथम – केतन जोशी (शेकी, द शेक्सपीअर एक्सपेरिमेंट), द्वितीय – सचिन भावे (विक्रम, एनिग्मा), तृतीय – रोहन गुप्ते (देशपांडे, मेला तो देशपांडे).
उत्कृष्ट अभिनय (स्त्री गट) : प्रथम – रेश्मा परुळेकर (देवयानी, बंदिनी), द्वितीय – सोनाली पोटे (शालू, हो मालक), तृतीय – सुजाता देशमुख (कृष्णा, सख्खे शेजारी).
अभिनय उत्तेजनार्थ : मोहिनी कांबळे (सरस्वती, चोर आले पाहिजेत), रोहन गुप्ते (गुप्ते, हसरे दु:ख), कल्पना किर्तने (गुजराथी बाई, फक्त एकदाच), मानसी गोरे (मालती, असा ही एक डाव), प्रज्ञा कुवाडेकर (मी.ना. मंत्री, व्हॉटस्अॅप युनिर्व्हसीटीत अडकलेली म्हातारी), संजीव कुवाडेकर (डॉ. कुलकर्णी, माया), माधवी तावडे (राधिका, वास्तव), संदिप सावंत (कृष्ण, प्रेक्षकांनी क्षमा करावी), विनया बापट (आजी, लॉकडाऊन एक प्रवास), मुकुंद देशपांडे (मामा, बंदिनी).
अभिनय लक्षवेधी : अनिरुद्ध पोतनीस (मंग्या, हो मालक), प्रशांत मोहिते (ओंकार, लॉटरी), श्रेया पटवर्धन (मुक्ता, लॉटरी), मनिष प्रधान (तात्या, सख्खे शेजारी), संजय चौलकर (सासरा, हसरे दु:ख), अनन्या पंडित (आई, आम्हाला काही सांगायचय), आरिन जोशी (बाबा, आम्हाला काही सांगायचय), अवनी दौंडे (अवनी, आम्हाला काही सांगायचय)
उत्कृष्ट संगीत : प्रथम – कार्तिक देवधर (बंदिनी).
उत्कृष्ट प्रकाशयोजना : प्रथम – समीर बोरकर (बंदिनी), द्वितीय -राहुल कुलकर्णी (एनिग्मा).
उत्कृष्ट नेपथ्य : प्रथम – लॉक डाऊन एक प्रवास.
उत्कृष्ट लेखन : प्रथम – डॉ. मीना नेरूरकर (हो मालक), द्वितीय – निलेश गद्रे (बंदिनी), तृतीय – देवदत्त परांजपे (लॉकडाऊन एक प्रवास).
उत्कृष्ट तंत्रज्ञान : प्रथम – सीया खारकर (वॉटस्अॅप युनिर्व्हसीटीत अडकलेली म्हातारी)
